हरारे - बांग्लादेशचा स्टार फलंदाज महमुदुल्लाहने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान, तिने या कसोटीनंतर आपण निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचा हा निर्णय धक्कादायक यासाठी की, महमुदुल्लाहने एक दिवसाआधीच १५० धावांची खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले होते. अशा फलंदाजाने अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने, बांगलादेशी चाहत्यांना धक्का बसला आहे.
महमुदुल्लाहने संघातील खेळाडूंना निवृत्ती घेणार असल्याचे सांगितलं. एका संकेतस्थळालने दिलेल्या वृत्तानुसार, महमुदुल्लाहने अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाला कळवला. तेव्हा खेळाडूंसह संघ व्यवस्थापनाला यावर विश्वास बसला नाही. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने महमुदुल्लाहच्या निवृत्तीची माहिती दिली.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, होय, आम्हाला महमुदुल्लाह याने कळवले आहे की, तो या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार नाही. पण त्याने हा निर्णय सांगताना आम्हाला याचे कारण सांगितलं नाही. त्याने हा निर्णय भावनेच्या भरात घेतला आहे का हे आम्ही पाहत आहोत.
महमुदुल्लाहने आपल्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. त्याने सांगितलं की, कसोटी क्रिकेटसाठी मला मानसिक तयारी करण्यात समस्या येत आहेत. दरम्यान, महमुदुल्लाहने घेतला हा निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. कारण त्याची निवड बांगलादेशच्या तिन्ही संघात होत होती.
महमुदुल्लाहने झिम्बाब्वे विरुद्ध सुरू असलेल्या एकमात्र कसोटी सामन्यात १५० धावांची खेळी केली. त्याचा हा कारकिर्दीतला ५० वा कसोटी सामना आहे. महमुदुल्लाहने कसोटी क्रिकेटमध्ये ३४च्या सरासरीने २ हजार ९१४ धावा केल्या आहे. यात ५ शतकं आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने गोलंदाजीत ४३ गडी बाद केले आहे.
हेही वाचा - हरभजन सिंग दुसऱ्यांदा बाबा झाला! गीता बसराने दिला गोंडस मुलाला जन्म
हेही वाचा - Ind w vs Eng w : हरलीन देओल घेतलेला 'सुपर झेल', पाहणारा प्रत्येक जण झाला थक्क