ETV Bharat / sports

ICC 2021 Award: बाबर आझम ठरला 2021चा वनडे क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याची 2021 या वर्षातील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू (ODI Cricketer of the Year) म्हणून निवड करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यात त्याने दोन शतकं झळकावताना 405 धावा केल्या आहेत.

Babar Azam
Babar Azam
author img

By

Published : Jan 24, 2022, 5:27 PM IST

दुबई: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Pakistan captain Babar Azam) याला सोमवारी 2021 सालचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू (The best players in ODI cricket) म्हणून घोषित करण्यात आले आहे. आझमने बांगलादेशचा शाकिब अल हसन, दक्षिण आफ्रिकेचा जेनेमन मलान आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांना मागे टाकत या पुरस्कारवर आपले नाव कोरले आहे. याआधी, आयसीसी पुरस्कारांच्या या मोसमात, आझमची 2021 च्या पुरुष एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार म्हणून देखील निवड करण्यात आली होती.

  • ⭐️ Shakib vs Babar vs Malan vs Stirling ⭐️

    The winner of the 2021 ICC Men's ODI Cricketer of the Year has been announced ⬇️https://t.co/M2f6dkelFf

    — ICC (@ICC) January 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावर प्रतिक्रिया देताना बाबर आझम म्हणाला, सर्वप्रथम मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि मला मत दिल्याबद्दल मी चाहत्यांचा खुप आभारी आहे. त्यानंतर मी पीसीबी (Pakistan Cricket Board ), आयसीसी (International Cricket Council) आणि विशेषत: माझ्या पाकिस्तान संघाने पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. त्यांच्याशिवाय हे यश शक्य नव्हते. तसेच इतका चांगला संघ मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे, ज्यांनी (माझ्या यशासाठी) खूप प्रार्थना केली.

आझमने 2021 मध्ये केवळ सहा एकदिवसीय सामने खेळले असतील, परंतु त्याने या वर्षी पाकिस्तानने खेळलेल्या दोन मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्याने सहा सामन्यांमध्ये दोन शतकांच्या मदतीने 67.50 च्या सरासरीने 405 धावा केल्या. यामध्ये त्यने सर्वोत्तम कामगिरी इंग्लंडविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात केली होती.

बाबर आझम म्हणाला, तुम्ही जर मला विचारले सर्वात बेस्ट खेळी कोणती तर, मी म्हणेल इंग्लंड विरुद्धची 158 धावांची खेळी. जी माझी सर्वोच्च धावसंख्या आहे. मला वाटते की, माझ्या कारकिर्दीतील ती सर्वश्रेष्ठ खेळी आहे. तेव्हा मी संघर्ष करत होतो. त्यावेळी माझ्यासाठी एका चांगल्या खेळीची गरज होती. जी मला मिळाली आणि त्याचबरोबर माझा आत्मविश्वास देखील वाढला. दक्षिण आफ्रिका विरुध्दच्या मालिकेत पाकिस्ताने 2-1 ने मालिका जिंकली होती. त्या मालिकेतील दोन सामन्यात तो सामनावीर ठरला होता.

हेही वाचा : Icc 2021 Awards: स्मृती मंधाना ठरली 2021 ची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू; दुसऱ्यांदा मिळाला हा मान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.