दुबई - पाकिस्तानचा युवा कर्णधार बाबर आझमने भारतीय संघाचा अनुभवी कर्णधार विराट कोहलीला जबर धक्का दिला आहे. बाबरने विराटकडून एकदिवसीय क्रिकेटमधील 'नंबर वन'चे सिंहासन पळवले आहे. बाबरने एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थान काबीज केले आहे. विराट एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत तब्बल १२५८ दिवस अव्वलस्थानावर होता.
-
Babar Azam 🔝🔥
— ICC (@ICC) April 14, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Pakistan captain has overtaken Virat Kohli to become the No.1 batsman in the latest @MRFWorldwide ICC men's ODI rankings 👑 pic.twitter.com/krxoKRDsSY
">Babar Azam 🔝🔥
— ICC (@ICC) April 14, 2021
The Pakistan captain has overtaken Virat Kohli to become the No.1 batsman in the latest @MRFWorldwide ICC men's ODI rankings 👑 pic.twitter.com/krxoKRDsSYBabar Azam 🔝🔥
— ICC (@ICC) April 14, 2021
The Pakistan captain has overtaken Virat Kohli to become the No.1 batsman in the latest @MRFWorldwide ICC men's ODI rankings 👑 pic.twitter.com/krxoKRDsSY
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बाबर आझमने दमदार खेळ केला. त्याला या कामगिरीचा फायदा क्रमवारीत झाल्याचे पाहायला मिळाले. आयसीसीने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात बाबर ८६५ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तो कर्णधार विराट कोहलीपेक्षा ८ गुणांनी पुढे आहे. विराट या यादीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
अशी कामगिरी करणारा बाबर पाकिस्तानचा चौथा खेळाडू -
एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वलस्थान पटकावणारा बाबर पाकिस्तानचा चौथा खेळाडू ठरला. याआधी जहीर अब्बास, जावेद मियाँदाद, मोहम्मद युसूफ यांनी असा कारनामा केला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी बाबरचे ८३७ गुण होते. त्याने या मालिकेत एक शतकासह, निर्णायक सामन्यात ९४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने तीन सामन्याची मालिका २-१ ने जिंकली होती.
हेही वाचा - विमानामध्ये एकट्याला भीती वाटते; पाकिस्तानच्या गोलंदाजाचा झिब्बाब्वे दौऱ्याला जाण्यास नकार
हेही वाचा - IPL २०२१ : ऑरेंज आर्मी पहिल्या विजयाच्या शोधात; आज बंगळुरू-हैदराबाद यांच्यात भिडत