नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आऊट ऑफ फॉर्ममध्ये ( Former captain Virat Kohli ) आहे. इंग्लंड दौऱ्यात तो सपशेल अपयशी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहली मांडीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता आणि दुसऱ्या सामन्यात त्याला केवळ 16 धावा करता आल्या होत्या. कोहलीच्या या वाईट टप्प्यात अनेक दिग्गजांनी त्याला साथ दिली, तर काहींनी त्याच्यावर टीका करत सल्लेही दिले.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम कोहलीच्या समर्थनात समोर आला ( Azam came in support of Kohli ) आहे. त्याने कोहलीसोबतचे आपले घट्ट नाते सांगणारी पोस्ट शेअर केली आहे. बाबरने कोहलीला मजबूत राहण्यास सांगितले. हा वाईट टप्पा लवकरच निघून जाईल ( This bad phase will pass soon ), असे पाकिस्तानी कर्णधाराने पोस्टच्या माध्यमातून कोहलीला समजावून सांगितले. त्याने याबाबतचे ट्विट केले आहे.
-
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
दुसऱ्या वनडेत इंग्लंडने भारतावर 100 धावांनी मात केली. रन मशीन म्हणवल्या जाणाऱ्या विराट कोहलीची ( Virat Kohli out of form ) बॅट पुन्हा धावा करु शकली नाही. विराट कोहली 16 धावांच्या खेळीनंतर बाद झाला. विराटशिवाय सूर्यकुमार यादवने 27 धावा केल्या, तर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाने 29-29 धावा केल्या. यानंतर लवकरच भारतीय सेना अवघ्या 146 धावांवर आटोपली. त्यामुळे टीम इंडियाला 100 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
हेही वाचा - Cricket and Bollywood : 'या' क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींना बनवले जीवन सोबती, तर काही करतायेत डेट