ETV Bharat / sports

Ind Vs Aus 2nd Test : दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी खेळाडूंची संघावर जोरदार टीका - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता भारताला मालिका जिंकण्यासाठी फक्त एकच सामना जिंकायचा आहे. तर दुसरीकडे दिल्ली कसोटी हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्याच संघावर ताशेरे ओढले आहेत.

Ind Vs Aus 2nd Test
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
author img

By

Published : Feb 20, 2023, 6:52 AM IST

नवी दिल्ली : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये 4 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने गमावल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ आणि कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर ऑस्ट्रेलियन मीडियाने निशाणा साधला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचे समालोचक मार्क वॉ याने दिल्ली कसोटी पराभव लाजिरवाणा असल्याचे सांगत ऑस्ट्रेलियन संघावर जोरदार टीका केली आहे.

  • Feels like I’m watching a highlights package in Delhi, India on the rampage.
    Anything above a 170 will be hard to chase. #INDvAUS

    — Tom Moody (@TomMoodyCricket) February 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऑस्ट्रेलियन मीडियाची टीका : मार्क वॉ म्हणाला की, ऑस्ट्रेलियाला दिल्ली कसोटी जिंकण्याची मोठी संधी होती, पण संघाने ती संधी गमावली. आता ऑस्ट्रेलियासाठी मालिकेत पुनरागमन करणे खूप कठीण झाले आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेट फॉक्स क्रिकेटशी बोलताना, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर म्हणाला की, या लाजिरवाण्या पराभवामुळे मी खूप निराश आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाच्या स्पोर्ट्स बीटचे कव्हर करणाऱ्या जॉन राल्फने ट्विट केले की, 'होय, मी सहमत आहे की ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या शॉटची निवड भयंकर आहे. मी खेळपट्ट्यांना दोष देत नाही. जेव्हा तुम्ही चिडचिड कराल तेव्हा तुम्ही भारतामध्ये आम्ही पुरेसे चांगले नाही या वास्तवाकडे दुर्लक्ष कराल. पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, आज आम्ही ज्याप्रकारे क्रिकेट खेळलो त्याचा मला खूप राग आला आहे. फलंदाजांनी त्यांच्या योजना योग्य रितीने आमलात आणल्या नाहीत. त्यांनी खेळलेले स्वीप शॉट्स घातक ठरले.

  • I am choosing to get outraged about the doctored Indian decks again rather than accept the reality they bask in these conditions and we don't have many answers #moretroublethanearlysettlers

    — Jon Ralph (@RalphyHeraldSun) February 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुजाराचा 100 वा कसोटी सामना : दुसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 262 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 113 धावांत गडगडला. भारताने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 26 व्या षटकात लक्ष्य गाठून दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारताला 114 धावांचे लक्ष मिळाले होते, जे भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात सहजरित्या गाठले. केएस भरतने 23 धावांवर तर चेतेश्वर पुजार 31 धावांवर नाबाद राहिले. हा सामना चेतेश्वर पुजारासाठी खास होता, कारण हा त्याचा 100 वा कसोटी सामना होता. असे करणारा तो भारताचा 13वा खेळाडू ठरला. या खास प्रसंगी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याला संघाच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली.

हेही वाचा : IND vs AUS 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव, भारताची मालिकेत 2-0 ने आघाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.