दुबई आशिया चषक 2022 स्पर्धेला आजपासून शानदार सुरुवात होणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी सहा संघ भिडणार आहेत. सहा संघाना प्रत्येकी दोन गटात विभागले आहे. त्यापैकी अ गटात भारत, पाकिस्तान व्यतिरिक्त प्रथमच पात्र ठरलेला संघ हाँगकाँग आहे. त्याचबरोबर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना आहे. भारत-पाकिस्तान सामना रविवारी 28 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सर्व फॉरमॅटमध्ये शंभर सामने खेळणारा विराट पहिला खेळाडू ठरेल
आशिया चषक 2022 च्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करेल. तेव्हा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या 100 व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून खेळेल. यादरम्यान कोहली भारताकडून खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये शंभर सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरेल. 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून विराट सतत क्रिकेट खेळत आहे. त्याच्या शानदार कारकिर्दीत विविध चढ-उतार असूनही ही आकडेवारी सातत्य दर्शवते. ज्यातून त्याची खेळाप्रती असलेली आवड आणि समर्पण दिसून येते. रविवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यासाठी कोहली मैदानात उतरेल तेव्हा सामना जिंकून देणारी खेळी खेळण्याचा विचार त्याच्या मनात असेल.
-
It's @imVkohli like you've never seen him before as he opens up to his fans in a special episode of Virat: Heart To Heart.
— Star Sports (@StarSportsIndia) August 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Catch it today at 5 PM on Star Sports & Disney+Hotstar.#KingKohli #TeamIndia | #AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/3GaIJ24SKe
">It's @imVkohli like you've never seen him before as he opens up to his fans in a special episode of Virat: Heart To Heart.
— Star Sports (@StarSportsIndia) August 27, 2022
Catch it today at 5 PM on Star Sports & Disney+Hotstar.#KingKohli #TeamIndia | #AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/3GaIJ24SKeIt's @imVkohli like you've never seen him before as he opens up to his fans in a special episode of Virat: Heart To Heart.
— Star Sports (@StarSportsIndia) August 27, 2022
Catch it today at 5 PM on Star Sports & Disney+Hotstar.#KingKohli #TeamIndia | #AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/3GaIJ24SKe
10 वर्षात पहिल्यांदा एक महिना माझी बॅट धरली नाही
कोहलीला कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावून 1000 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले Virat Kohli last Century आहेत. अलीकडेच विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यानंतर क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. यादरम्यान कोहलीने महिनाभर विश्रांती घेतली आणि बॅटला हातही लावला नाही. याचा खुलासा खुद्द कोहलीने केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोहलीने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधला. ज्यात कोहली म्हणाला, 10 वर्षात पहिल्यांदा मी एक महिना माझी बॅट हातात धरली Not catch the bat for a month नाही. गेल्या काही काळापासून मी माझी तीव्रता चुकीच्या पद्धतीने राखण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला कळले. मी स्वतःला पटवून देत होतो की माझ्यात ती तीव्रता आहे, पण तुझे शरीर तुला थांबायला सांगत आहे. माझे मन मला विश्रांती घे म्हणून सांगत होते.
हा काळ मला खूप काही शिकवून गेला
विराट कोहली म्हणाला Virat Kohli Emotional Statement की, तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे, परंतु प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. तो म्हणाला, मला एक अशी व्यक्ती समजली जाते जी मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे आणि मी आहे. पण प्रत्येकाला एक मर्यादा असते आणि ती मर्यादा तुम्ही ओळखली पाहिजे नाहीतर गोष्टी चुकतात. हा काळ मला खूप काही शिकवून गेला. ज्या गोष्टी समोर येत नव्हत्या. मी त्यांचा स्वीकार केला आहे. याबाबत कोहली म्हणाला की, मी मानसिकदृष्ट्याही कमकुवत होतो. हे मान्य करायला मला काहीच हरकत नाही. ही एक अतिशय सामान्य गोष्ट होती, जी मला जाणवली, परंतु आपण संकोचामुळे बोलत नाही. आम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत दिसायचे नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, कमकुवत असल्याचे कबूल करण्यापेक्षा बलवान असल्याची बतावणी करणे अधिक धोकादायक आहे.