ETV Bharat / sports

अश्विन कोरोना पॉजिटीव्ह, ​​इंग्लंडवारी हुकली

अश्विन सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. सर्व प्रोटोकॉल आवश्यकता पूर्ण केल्यानंतरच तो संघात सामील होईल.

अश्विन कोरोना पॉजिटीव्ह, ​​इंग्लंडवारी हुकली
अश्विन कोरोना पॉजिटीव्ह, ​​इंग्लंडवारी हुकली
author img

By

Published : Jun 21, 2022, 9:37 AM IST

नवी दिल्ली: ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांसह युनायटेड किंगडमला एकदिवसीय 'पाचव्या कसोटी'साठी त्यांनी प्रवास करणे टाळले. बीसीसीआयच्या सूत्राने सोमवारी पीटीआयला ही माहिती दिली. अश्विन सध्या क्वारंटाईनमध्ये आहे आणि सर्व प्रोटोकॉल आवश्यकता पूर्ण केल्यानंतरच तो संघात सामील होईल.

भारतीय संघ 16 जून रोजी यूकेला रवाना झाला होता. "अश्विनला रवाना होण्यापूर्वी कोविड 19 पॉझिटिव्ह आल्याने तो संघासह यूकेला गेला नाही. परंतु कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी तो वेळेत बरा होईल अशी आम्हाला आशा आहे." बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला ही माहिती दिली.

तथापि, त्याचा लीसेस्टरशायरविरुद्धचा सराव सामना चुकू शकतो, अशी माहिती मिळत आहे. उर्वरित संघ आधीच लीसेस्टरमध्ये आहे आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण सुरू केले आहे. राहुल द्रविड, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 संपवून लंडनला पोहोचले आहेत. ते मंगळवारी ते लीसेस्टरला जाणार आहेत.

व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली आयर्लंडला जाणारा संघ 23 किंवा 24 जूनला डब्लिनला रवाना होईल कारण संघातील सदस्यांना तीन दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे.

हेही वाचा - Demand to BCCI : बीसीसीआयकडे करण्यात आली अनेक स्टेडियममध्ये सुधारणा करण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.