मुंबई - भारतीय महिला क्रिकेटर अंशुला राव उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. यामुळे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) अंशुलावर चार वर्षांसाठी बंदी घातली आहे. दरम्यान, अंशुला उत्तेजक चाचणीत अपयशी ठरणारी भारताची पहिला महिला क्रिकेटर ठरली आहे.
अंशुला राव ही मध्य प्रदेशकडून क्रिकेट खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू आहे. तिची दोनदा चाचणी करण्यात आली. यात दोन्ही वेळा ती चाचणीत दोषी आढळली. दुसऱ्यादा करण्यात आलेल्या चाचणीचा खर्च देखील अंशुला राव याला करावा लागणार आहे. तो खर्च २ लाख रुपये इतका आहे.
अंशुला हिने तिचा परफॉर्मंन्स वाढवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक उत्तेजक द्रव पदार्थाचे सेवन केले. अंशुला २०१९-२९० या सत्रात २३ वर्षाखालील स्पर्धेत अखेरची खेळली होती. मागील वर्षी मार्चमध्ये उत्तेजक पदार्थ सेवन केल्याने तिचे निलंबन करण्यात आले होते.
अंशुला हिचे दोन सॅम्पल तपासणीसाठी बेल्जियमला पाठवण्यात आले होते. या चाचणीत प्रतिबंधक द्रव पदार्थ तिने सेवन केल्याचे समोर आले आहे. यामुळे तिच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी भारतीय पुरूष क्रिकेटर पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळे त्याचे निलंबन करण्यात आले होते. २०१९ मध्ये त्याने स्थानिक स्पर्धेत सीरप घेतले होते. यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर ८ महिन्याची बंदी घातली होती. शॉ याने याविषयी, खोकला आल्याने मी वडिलांना विचारुन ते औषध घेतल्याचे सांगितलं होतं.
हेही वाचा - बेन स्टोक्सने जुना हिशोब केला चुकता; ब्रेथवेटला चोपलं, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - ENG vs SL : श्रीलंकन क्रिकेटपटूंची इंग्लंडच्या रस्त्यावर सिगारेट पार्टी; तिघांचे निलंबन, पाहा व्हिडिओ