ETV Bharat / sports

Akash Madhwal : RCBने बाकावर बसवलं पण MI ने अनलिमिटेड गुण पाहिले अन् आकाशने रचला इतिहास - मुंबई इंडियंस vs लखनऊ सुपरजायंट्स

आयपीएल 2023 चा एलिमिनेटरच्या सामन्यात आकाशने 3.3 ओव्हरमध्ये पाच धावा देत पाच गडी बाद केले. अनकॅप बॉलरची आयपीएल इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम या स्टेडियम झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने लखनऊसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य लखनऊला आकाशमुळे पार करता आले नाही.

Akash Madhwal
आकाश मढवाल
author img

By

Published : May 25, 2023, 10:10 AM IST

Updated : May 25, 2023, 2:52 PM IST

चेन्नई : आयपीएल 2023 चा एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा दारुण पराभव केला. या विजयासह मुंबई पलटणने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम या स्टेडियम झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने लखनऊसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य लखनऊचे नबाब सहजगत्या पार करतील असे वाटले होते. कारण या हंगामात लखनऊकडून मुंबईला नेहमी पराभव मिळत होता. सहज वाटणारे आव्हान पार करणे लखनऊच्या संघाला कठीण झाले. याचे कारण ठरला मुंबईचा दुसरा स्काय, म्हणजे आकाश मढवाल.

आकाशने घडवला इतिहास : आकाश मढवालने अवघ्या पाच धावांमध्ये 5 विकेट्स मिळवल्या. आतापर्यंत अशी कामगिरी आयपीएलच्या इतिहासात कोणालाही करता आली नव्हती. आकाशने 3.3 ओव्हरमध्ये पाच धावा देत पाच गडी बाद केले. अनकॅप बॉलरची आयपीएल इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीच्या यादीत आकाश पाचव्या क्रमांकावर आला आहे.

याआधी या गोलंदाजांनी केला करिष्मा : यापूर्वी अल्झारी जोसेफने मुंबईकडून खेळताना 12 रनवर 6 विकेट घेतल्या होत्या. ही कामगिरी आजही सर्वोत्तम आहे. तर सोहेल तनवीरने सीएसकेविरुद्ध 14 रनवर 6 विकेट, एडम झम्पाने हैदराबादविरुद्ध 19 रनवर 6 विकेट तर अनिल कुंबळेनेही राजस्थानविरुद्ध 5 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. वरुण चक्रवर्तीने दिल्लीविरुद्ध 20 धावा देत 5 गडी बाद केले होते. तर उमरान मलिकने गुजरातविरुद्ध 25 रन देऊन 5 गडी बाद केले होते.

प्ले-ऑफच्या खेळात जबरदस्त कामगिरी : आयपीएल प्ले-ऑफच्या इतिहासातली आकाशची ही सर्वोत्तम कामगिरी. उत्तराखंडकडून आयपीएल खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे. दरम्यान डग बॉलिंगरने 2010 सालच्या सेमी फायनलमध्ये 13 रनवर 4 विकेट, जसप्रीत बुमराहने 2020 च्या क्वालिफायर1 मध्ये 14 रनवर 4 विकेट, तर धवल कुलकर्णीने 2016 च्या क्वालिफायर1 मध्ये 14 रनवर 4 विकेट घेतल्या होत्या. पण आकाश हा अनकॅप खेळाडू आहे. तरीही त्याने इतकी चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आकाशने आपल्या 3.3 षटकात फक्त 5 धावा देत 5 गडी बाद केले. मागील 4 सामन्यामध्ये त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत.

कोण आहे आकाश : खरेतर आकाशला आयपीएलच्या मैदानात आणले आरसीबीने आणले होते. आरसीबीने त्याच्यावर मेहनत घेतली. पण त्याला संधी मात्र दिली नाही. पण मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्यातील गुण पाहिले आणि त्याला संधी दिली. मढवाल हा ऋषभ पंतचा शेजारी राहणारा आहे. हो धांडेरामधील रुरकी गावात ऋषभ पंत आणि आकाश शेजारी होते. आकाशने इंजिनिअरींचे शिक्षण पूर्ण केले आहे. क्रिकेट आपला छंद मानणारा आकाशने आज नवा इतिहास घडवला आहे. अवतार सिंग यांनी आकाशला क्रिकेटचे धडे दिले आहेत. अवतार यांनी ऋषभ पंतला देखील क्रिकेट शिकवत होते. आकाश हा उत्तराखंड रणजी ट्रॉफीमध्ये खेळ नव्हता. तो फक्त टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असायचा. पंरतु त्या क्रिकेटमध्येही तो एक दहशत होता, असे अवतार सिंग म्हणतात.

उत्तराखंडचे मुख्य प्रशिक्षक झा काय म्हणातात : उत्तराखंडचे मुख्य प्रशिक्षक झा त्याच्याविषयी म्हणातात की, तो 2019 मध्ये चाचणीसाठी आला होता, तेव्हा आम्ही सर्वजण प्रभावित झालो होतो. तो चपळ आणि वेगवान आहे. त्याच्या एक एक्स-फॅक्टर आहे. ही गोष्ट वसीम भाई यांना समसली होती आणि त्यांनी त्याला सय्यद मुश्ताक अली कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात संधी दिली होती.

मुंबईच्या संघात आधीही मिळाली होती : आकाश मढवालचा गेल्या वर्षी मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्यात आला होता. त्याला सूर्याच्या जागी संघात संधी देण्यात आली होती. हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे काही सामन्यांतून तो बाहेर पडला होता. यंदा आकाशने आयपीएलमध्ये आपले दमदार प्रदर्शन केले. आरसीबीने त्याला एकाही सामान्यात खेळण्याची संधी दिली नव्हती. त्यानंतर आकाश मुंबईच्या संघात आला. आकाशला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबईला जास्त काही पैसे मोजले नाहीत. मुंबईने लिलावात त्याला फक्त २० लाख रुपयात आपल्या गटात समाविष्ट केले. त्यानंतर झहीर खानने त्याच्यावर चांगलीच मेहनत घेतली.

बनला डेथ ओव्हरचा गोलंदाज : यंदा पंजाब किंग्जविरुद्ध मुंबईकडून पदार्पण केले. त्याने या सामन्यातील डेथ ओव्हरमध्येही भन्नाट कामगिरी केली. आकाशने पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा दिल्या. यानंतर कर्णधार रोहितने त्याला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिली. आकाशने 18 व्या षटकात 12 आणि 20 व्या षटकात 9 धावा दिल्या होत्या.गेल्या आठवड्यात गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने नवा चेंडूने गोलंदाजी करताना कमाल केली होती. रिद्धिमान साहा, शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट घेत घेतल्या होत्या. रविवारी दुपारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धात सुरू असलेल्या सामन्यातही त्याने डेथ ओव्हर्समध्ये कमाल केली होती. हैदराबाद 220-प्लसच्या धाव संख्येकडे वाटचाल करत होता तेव्हा त्याने जरबदस्त गोलंदाजी केली होती. काल लखनऊविरुद्धच्या सामन्यात त्याने कमालच केली. पहिल्या तीन ओव्हरमध्ये आकाशने फक्त पाच धावा देत पाच बळी घेतले. त्यामुळे मुंबईच्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे. आकाशने यावेळी मोठा पराक्रम केला असून आयपीएलच्या इतिहासात पाच धावांत पाच बळी मिळवणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.

गेल्यावर्षी, सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बाहेर झाला होता, त्याच्या बदल्यात आकाश मढवालला मुंबई इंडियन्समध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. आता तो रोहित शर्माचा गो-टू गोलंदाज बनला आहे. डग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज तो बनला आहे.- प्रशिक्षक झा

हेही वाचा

  1. IPL 2023 : चेन्नई एक्सप्रेस सुसाट . . . चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवून गाठली अंतिम फेरी
  2. IPL 2023 : रोमांचक सामन्यात कोलकाताचा 1 धावांनी पराभव करत लखनौ प्लेऑफ मध्ये

Last Updated : May 25, 2023, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.