ETV Bharat / sports

IPL 2022 Latest Update : माझ्यावर 13 कोटीची बोली लागली, तेव्हा बोली थांबावी असे मला वाटत होते - दीपक चहर - Deepak Chahar wanted stop bidding 13crore

सीएसकेने चहरला 14 कोटी रुपयांमध्ये ( CSK bought Chahar for 14 crore ) पुन्हा आपल्या संघात समाविष्ट केले आहे. तो आयपीएल लिलावात सर्वाधिक महागडा भारतीय गोलंदाज ठरला आहे. चहर म्हणाला की, तो चेन्नईशिवाय इतर कोणत्याही संघाचा भाग होण्याचा विचार करू शकत नाही.

Deepak Chahar
Deepak Chahar
author img

By

Published : Feb 15, 2022, 8:07 PM IST

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) च्या स्पर्धेसाठी बंगळुरु येथे 12 आणि 13 फेब्रुवारीला लिलाव पार पडला. या लिलावात दीपक चहर सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. या लिलावानंतर दीपक चहरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये तो म्हणाला की, मला 13 कोटीची बोली लागल्यानंतर वाटत होते, की यावर बोली थांबली जावी. कारण यामुळे मजबूत संघ बनवण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकत होती.

सीएसकेने दीपक चहरला 14 कोटी बोली ( CSK Deepak Chahar bids Rs 14 crore ) लावत आपल्या संघात सामिल करुन घेतले. तो लिलावात सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला. दीपक चहर म्हणाला, मी चेन्नई संघा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच संघाचा भाग होण्याचा विचार सुद्धा करु शकत नाही.

दीपक चहर स्टार स्पोर्टस सोबत बोलताना म्हणाला, "मला सीएसके कडून खेळायचे होते. कारण मी पिवळ्या जर्सी (चेन्नई आउटफिट) व्यतिरिक्त कोणत्याही जर्सीत खेळण्याची कल्पनाही केली नव्हती. "एक वेळेस मला वाटले, की ती (बोलीची रक्कम) खूप जास्त आहे. सीएसकेचा खेळाडू असल्याने, माझी इच्छा होती की आम्ही एक चांगला संघ तयार करावा. त्यामुळे जेव्हा त्यांनी 13 कोटी रुपये खर्च केले होते, तेव्हा मला खरोखर असे वाटले की, आता बोली थांबली ( Deepak Chahar wanted stop bidding 13crore ) पाहिजे. जेणेकरुन मी लवकरात लवकर सीएसके कॅम्पमध्ये प्रवेश करू शकेन आणि त्यानंतर उरलेल्या पैशाने आम्ही काही इतर खेळाडू खरेदी करावे.”

चहर, जो आता भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा सदस्य आहे, तो म्हणाला की 2018 मध्ये त्याला फ्रँचायझीचे मालक एन श्रीनिवासन ( CSK franchise owner N Srinivasan ) यांनी सांगितले होते की, 'तू नेहमी पिवळ्या जर्सीत खेळशील'. यानंतर त्याने संघ व्यवस्थापन किंवा कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी त्याला कायम ठेवण्याबाबत कधीही चर्चा केली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.