चिक्कमगलुरू - भारतीय महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीची बहिण वत्सला यांचं कोरोनाने निधन झालं. दरम्यान काही दिवसांपूर्वीच वेदाची आईचं कोरोनाने निधन झालं आहे.
वत्सला (वय ४०) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चिक्कमगलुरू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मावळली.
![after-her-mother indian cricketer veda krishnamurthy lost-her-sister-by-covid](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11658657_920_11658657_1620277849663.png)
वेदाची आई चेलुवम्बा देवी (६०) यांचं दहा दिवसांपूर्वीच कोरोनाने निधन झालं आहे. दहा दिवसात आई आणि बहिणीचा मृत्यू झाल्याने, वेदावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, वेदाने भारतीय महिला संघाकडून ४८ एकदिवसीय, ७६ टी-२० सामने खेळली आहेत. वेदाला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
आईच्या निधनानंतर वेदाने ट्विट करत काय म्हटलं -
वेदाने आईच्या निधनानंतर ट्विटर करत म्हटलं की, 'अम्माच्या निधनानंतर अनेकांनी मला फोन आणि मॅसेज करून शोकसंवेदना व्यक्त केल्या. मी त्यांचा सन्मान करते. तुम्ही सर्वजण जाणता की, आईशिवाय मी कुटुंबाविषयी विचार करू शकत नाही. माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करा. मी कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहे. अशा कठिण परिस्थितीतून जाणाऱ्या सर्वांबद्दल माझ्या संवेदना आहेत.'
हेही वाचा - मेरी कोमसह ९ महिला बॉक्सिंगपटू ट्रेनिंगसाठी येणार पुण्यात
हेही वाचा - छत्रसाल स्टेडिअममध्ये झालेल्या खूनाप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमार दिल्ली पोलिसांच्या रडावर