ETV Bharat / sports

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात शानदार कामगिरीसाठी अफगाणिस्तानचे 'हे' सहा धुरंधर सज्ज

आयपीएल 2022 स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विदेशी खेळाडूंची पावले आयपीएलकडे वळली आहेत. अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना ( Afghan cricketers ) इंडियन प्रीमियर लीगमध्ये ( Indian Premier League ) परदेशी असे लेबल लावले गेले असेल, परंतु ते त्यांचा जास्त वेळ भारतात घालवतात.

Afghan cricketers
Afghan cricketers
author img

By

Published : Mar 27, 2022, 10:45 PM IST

नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएल 2022 स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू बरोबरच विदेशी खेळाडू देखील सहभागी होतात. ज्यामध्ये अफगानिस्तानच्या खेळाडूंचा देखील समावेश असतो. अफगाणिस्तानच्या ज्यादातर क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळायचे होते, परंतु स्टार अष्टपैलू रशीद खानसह केवळ सहा खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच ते आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत.

राशिद खान (गुजरात टायटन्स) - राशिद खान (Spinner Rashid Khan ) गुजरात टायटन्स या नवीन फ्रँचायझीमध्ये सहभागी झाल आहे. तो संघातील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो, राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार हा आयपीएल 2022 चा सर्वात महागडा अफगाण खेळाडू आहे. गुजरात टायटन्सने त्याला 15 कोटींमध्ये खरेदी केले. राशिदने आतापर्यंत ७६ आयपीएल सामने खेळले असून 6.33 च्या इकॉनॉमी रेटने 93 बळी घेतले आहेत.

नूर अहमद (गुजरात टायटन्स) - फ्रँचायझीमध्ये राशिद खान सोबत 17 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमद ( Spinner Noor Ahmed ) याचाही समावेश आहे. जो आयपीएल 2022 मधील सर्वात तरुण खेळाडू आहे. नूरचे अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले नाही. परंतु गुजरात टायटन्सने त्याला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे.

रहमानउल्ला गुरबाज (गुजरात टायटन्स) - गुजरात टायटन्सने जेसन रॉयच्या जागी अफगाणिस्तानचा आणखी एक खेळाडू रहमानउल्ला गुरबाजला ( Rahmanullah Gurbaj ) करारबद्ध केले आहे. वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडचा स्टार खेळाडू जेसनने आयपीएल 2022 मधून माघार घेतली. त्यानंतर 20 वर्षीय खेळाडूने राशिद खान आणि नूर अहमद यांच्यासह गुजरात टायटन्समध्ये प्रवेश केला. गुरबाज 2021 मध्ये अबूधाबी येथे आयर्लंडविरुद्धच्या त्याच्या वनडे पदार्पणात शतक झळकावल्यानंतर प्रकाशझोतात आला होता. ही कामगिरी करणारा तो पहिला अफगाण क्रिकेटपटू ठरला. उजव्या हाताचा यष्टीरक्षक-फलंदाज, गुरबाजने 2018 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले. 2019 मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाल्यापासून, त्याने आतापर्यंत नऊ एकदिवसीय आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत

फजलहक फारुकी (सनराईजर्स हैदराबाद) - 20 वर्षीय युवा डावखुरा वेगवान गोलंदाजाचा सनरायझर्स हैदराबाद संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने 20 मार्च 2021 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तानकडून टी-20 पदार्पण केले. त्याच महिन्यात, चेन्नई सुपर किंग्जने 2021 च्या आयपीएलसाठी त्यांच्या संघात फारुकी ( Fazalhak Farooqi ) यांचा गोलंदाज म्हणून समावेश केला. फारुकी यांनी आयपीएलच्या 2020 हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी नेट गोलंदाज म्हणूनही काम केले. फारुकीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची चांगली सुरुवात केली, एकदिवसीय सामन्यांमध्ये चार सामन्यांत सात विकेट्स आणि टी-20 मध्ये तीन सामन्यांत सहा बळी घेतले आहेत.

मोहम्मद नबी (कोलकाता नाइट रायडर्स) - अफगाणिस्तानच्या टी-20 संघाचा कर्णधार मोहम्मद नबी ( Captain Mohammed Nabi ) आक्रमक अष्टपैलू खेळाडू आहे. जो उजव्या हाता फलंदाज आणि ऑफ-ब्रेक गोलंदाज म्हणून खेळतो. त्याला केकेआरने 1 कोटी रुपयांना विकत घेतले. 2009-10 आसीसी इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये झिम्बाब्वे इलेव्हन विरुद्ध नबीने अफगाणिस्तानसाठी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. मर्यादित षटकांची कारकीर्द लांबवण्यासाठी त्याने 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टी-20 चा प्रवासी म्हणून ओळखला जाणारा नबी मेलबर्न रेनेगेड्स, कराची किंग्ज आणि नॉर्थम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबसह अनेक फ्रँचायझींशी संबंधित आहे.

इजहारुलहक नवीद (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अफगानिस्तानचा युवा क्रिकेटपटू इजहारुलहक नवीदला ( Izharulhaq Naveed ) आयपीएल 2022 साठी नेट गोलंदाजाच्या रुपाने संघात सहभागी केले आहे. 18 वर्षीय लेग स्पिनरने नुकतेच पश्चिममध्ये आपल्या निर्दोष गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.

हेही वाचा - IPL 2022 MI v DC: दिल्लीने 4 विकेट्सने मुंबईला पाजले पराभवाचे पाणी; ललित-अक्षरची 75 धावांची अतूट भागीदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.