जयपूर(राजस्थान) : आयपीएल 2022 चा मेगा लिलाव बऱ्याच युवा खेळाडूंना फायदेशीर ठरला. तर काही दिग्गज खेळाडूंसाठी हा लिलाव काही विशेष ठरला नाही. या स्पर्धेसाठी जगातील विविध काना कोपऱ्यातून खेळाडू सहभागी होत असतात. तसेच यंदाच्या लिलावात राजस्थानच्या पाच खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. तसेच दुसरेकडे राजस्थानचे 11 खेळाडू अनसोल्ड राहिले. परंतु तरी देखील राजस्थान राज्यातील खेळांडूसाठी सर्व संघानी स्वारस्य दाखवले आहे.
यावेळी आयपीएलमध्ये राजस्थानचे नऊ खेळाडू वेगवेगळ्या संघातून आपले कौशल्य दाखवताना दिसणार आहेत. यामध्ये दीपक चहरली सर्वाधिक खर्च करून चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आपल्या संघात समावेश केला आहे. या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर चेन्नई सुपर किंग्सने दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्समध्ये (Deepak Chahar in Chennai Super Kings) 14 कोटी दिले आहेत, दिल्ली कॅपिटल्सने खलील अहमदला 5.25 कोटी (Khaleel Ahmed in Delhi Capitals), पंजाब किंग्सने राहुल चहरला 5.25 कोटी (Rahul Chahar in Punjab Kings) दिले आहेत. रवी बिश्नोई लखनौने 4 कोटींमध्ये सामील झाला आहे (Ravi Bishnoi in Lucknow Super Giants) आणि कमलेश नागरकोटी दिल्ली संघात (Kamlesh Nagarkoti in Delhi Capitals) 1.10 कोटींमध्ये सामील झाला आहे.
तसेच महिपाल लामरोरला आरसीबीने 95 लाखांमध्ये, अशोक शर्माला केकेआरने 55 लाखांमध्ये, अभिजित तोमरचा केकेआरने 40 लाखांमध्ये आणि शुभम गढवालचा राजस्थान रॉयल्सने 20 लाखांमध्ये समावेश केला आहे. मात्र, राजस्थानच्या इतर 11 खेळाडूंना कोणत्याही फेंचायझींनी खरेदी करणे पसंत केले नाही. दीपक चहर आणि राहुल चहर राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून खेळतात.
राजस्थानचे 'हे' खेळाडू अनसोल्ड राहिले (Rajasthan players remain unsold) -
राजस्थानमधून आलेले आकाश सिंग, तन्वीर, आकाश शर्मा, रवी शर्मा, तेजिंदर ढिल्लॉन, पुष्पेंद्र राठोड, साहिल दिवाण, अरिजित शर्मा, मानव सुथार, अनिकेत आणि शुभम शर्मा हे खेळाडू अनसोल्ड राहिले. या खेळाडूंना कोणताही खरेदीदार मिळाला नाही.
राजस्थान रॉयल्सचा संघ (Rajasthan Royals Team) -
देवदत्त पडिक्कल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, रायन पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रणम कृष्णा, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, तेजस बारोका, अनुय सिंग, कुलदीप सेन, ध्रुदीप जुरेल, के.सी. , शुभम गरवाल, नॅथन कुल्टर-नाईल, रासी व्हॅन डर ड्यूसेन, जेम्स नीशम, डॅरिल मिशेल, करुण नायर आणि ओबेद मॅकॉय.
हेही वाचा - IPL 2022 Mega Auction : लिलावानंतर कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर