कोलकाता - सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर ( West Indies tour of India ) आहे. या दौऱ्यात वनडे आणि टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी वनडे मालिका पार पडली आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजला 3-0 ने अशा फरकाने व्हाईट वॉश दिला होता. त्यानंतर या दोन्ही संघात कोलकाता येथे बुधवार (16 फेब्रुवारी) पासून टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे.
टी- 20 मालिकेसाठी भारत आणि वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंनी मागील दोन दिवसात नेटमध्ये घाम गाळला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former Indian captain Virat Kohli ) सपशेल अपयशी ठरला होता. या मालिकेत त्याच्या बॅटमधून धावा निघतील अशी अपेक्षा सर्वांना असणार आहे. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जशी वनडे मालिका जिंकली, तशी टी-20 मालिका देखील जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे. परंतु हे आव्हान थोडे अवघड असणार आहे.
-
📸📸 When two legends of Indian Cricket met at the Eden Gardens 👌👌#TeamIndia #INDvWI @Paytm pic.twitter.com/SfOiOogEPO
— BCCI (@BCCI) February 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">📸📸 When two legends of Indian Cricket met at the Eden Gardens 👌👌#TeamIndia #INDvWI @Paytm pic.twitter.com/SfOiOogEPO
— BCCI (@BCCI) February 15, 2022📸📸 When two legends of Indian Cricket met at the Eden Gardens 👌👌#TeamIndia #INDvWI @Paytm pic.twitter.com/SfOiOogEPO
— BCCI (@BCCI) February 15, 2022
कारण मागील दौऱ्यात वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडला टी-20 मालिकेत 3-2 ने धूळ चारली होती. त्यामुळे भारतीय संघासाठी ही टी-20 मालिका आव्हानात्मक ( T20 series challenging for India ) असणार आहे. तसेच क्रिकेटचा टी-20 हा फॉरमॅट वेस्ट इंडिज संघाचा विशेष आवडता फॉरमॅट आहे. त्यामुळे ही मालिका रंगतदार होणार यामध्ये काही शंका नाही.
-
Bull's-eye Bhuvi 🎯
— BCCI (@BCCI) February 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Sharp Siraj ⚡
A snippet of how the #TeamIndia speedsters sweated it out in the practice session under the watchful eyes of the Bowling Coach Paras Mhambrey at the Eden Gardens. 👌 👌#INDvWI | @Paytm | @BhuviOfficial | @mdsirajofficial pic.twitter.com/hMhCdAY9VJ
">Bull's-eye Bhuvi 🎯
— BCCI (@BCCI) February 15, 2022
Sharp Siraj ⚡
A snippet of how the #TeamIndia speedsters sweated it out in the practice session under the watchful eyes of the Bowling Coach Paras Mhambrey at the Eden Gardens. 👌 👌#INDvWI | @Paytm | @BhuviOfficial | @mdsirajofficial pic.twitter.com/hMhCdAY9VJBull's-eye Bhuvi 🎯
— BCCI (@BCCI) February 15, 2022
Sharp Siraj ⚡
A snippet of how the #TeamIndia speedsters sweated it out in the practice session under the watchful eyes of the Bowling Coach Paras Mhambrey at the Eden Gardens. 👌 👌#INDvWI | @Paytm | @BhuviOfficial | @mdsirajofficial pic.twitter.com/hMhCdAY9VJ
दरम्यान तीन दिवसापूर्वी आयपीएलच्या 15 व्या पर्वाचा मेगा लिलाव ( Mega auction 15th edition of IPL ) पार पडला होता. ज्यामध्ये युवा भारतीय खेळाडूंवर चांगली बोली लागली होती. तसेच लिलावात धमाकेदार बोली लागले युवा खेळाडू सध्या भारतीय संघात आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. पहिल्या टी-20 सामन्याला आज (16 फेब्रुवारी) संध्याकाळी सात वाजता सुरु होईल.
टी -20 मालिकेसाठी भारतीय संघ ( Indian team for T20 series ) :
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार), वेंकटेश अय्यर, दीपक चाहत, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल , रुतुराज गायकवाड, दीपक हुड्डा, कुलदीप यादव आणि हरप्रीत बरार
टी -20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजची संघ ( West Indies team for T20 series ) :
किरोन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन एलेन, डॅरेन ब्रावो, रोस्टन चेज, शेल्डन कॉटरेल, डोमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, ब्रँडन, रोवमैन पॉवेल, रोयलमारियो शेफर्ड, ओडियन स्लाईथ आणि हेडन वॉल्श जूनियर.