टोकियो - जगातील पहिल्या क्रमांकाचा पुरुष बॅडमिंटनपटू जपानचा केंटो मोमोटा कोरोनातून बरा झाला आहे. या चांगल्या घटनेनंतर मोमोटाने आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, मोमोटा १० दिवस विलगीकरणात होता.
''मला प्रचंड मेहनत घ्यायची आहे, जेणेकरून मी चमकदार कामगिरी करू शकेन'', असे मोमोटाने सांगितले. जपान संघासह थायलंडला रवाना होण्यापूर्वी टोकियोच्या नारिटा विमानतळावर मोमोटाची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती, त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) याबाबत वृत्त दिले होते.
पॉझिटिव्ह आल्यानंतरही मोमोटामध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. परंतु त्याला १० दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगितले गेले. या घटनेनंतर जपानने थायलंड ओपन स्पर्धेच्या एकेरी व दुहेरीतून माघार घेतली.
हेही वाचा - सेहवागने एका शब्दात केले टीम इंडियाच्या साहसाचे कौतुक