ETV Bharat / sports

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांत, प्रणॉय, प्रणीत दुसऱ्या फेरीत, समीर स्पर्धेबाहेर

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारताच्या खेळाडूंने एक सामना वगळता दुसरे सगळे सामने जिंकले आहेत. एकेरीत किदांबी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय, साई प्रणीत यांनी दुसरी फेरी गाठली. तर समीर वर्माला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. दुहेरीत मेघना जक्कमपुडी आणि एस. पूर्विशा राम या जोडीने विजय मिळवत दुसरी फेरी गाठली आहे.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांत, प्रणॉय, प्रणीत दुसऱ्या फेरीत, समीर स्पर्धेबाहेर
author img

By

Published : Aug 20, 2019, 11:02 AM IST

बासेल - भारताचा आघाडीचा पुरुष एकेरी खेळाडू किदांबी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय, साई प्रणीत यांनी बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली. तर भारताचा अव्वल खेळाडू समीर वर्मा याला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुहेरीत मेघना जक्कमपुडी आणि एस. पूर्विशा राम या जोडीनेही पहिल्या फेरीत विजय मिळवून दुसरी फेरी गाठली आहे.

श्रीकांतने एक तास सहा मिनिटे रंगलेल्या सामन्यात आयर्लंडच्या खेळाडू एनहाट एन्गुयेनचा १७-२१, २१-१६, २१-६ असा पराभव केला. सुरुवातीला श्रीकांतने पहिला गेम 17-21 ने गमावला त्यानंतर त्याने दुसर्‍या गेममध्ये शानदार पुनरागमन केले. भारतीय खेळाडूने दुसरा गेम २१-१६ असा जिंकून सामना रोमांचक बनविला आणि सामना तिसऱ्या गेमपर्यंत नेला. तिसर्‍या गेमच्या सुरुवातीपासूनच श्रीकांतने आपली आघाडी कायम राखत सामना जिंकला. श्रीकांतचा दुसर्‍या फेरीतील सामना इस्त्राईलच्या मीशा जिल्बरमनशी होणार आहे.

भारताचा खेळाडू साई प्रणीतने पहिल्या फेरीत कॅनडाच्या जेसन अँथनी सुईचा पराभव केला. प्रणितने ३९ मिनिट चाललेल्या सामन्यात अँथनीचा २१-१७, २१-१६ असा पराभव केला.

तर भारतीय प्रणॉयने फिनलँडच्या इटु हियानोला तीन गेममध्ये रंगलेल्या सामन्यात १७-२१, २१-१०, २१-११ ने पराभव केला. प्रणॉयचा दुसऱ्या फेरीतील सामना चीनच्या लिन डॅन याच्याशी होईल.

समीर वर्मा याचा पहिल्या फेरीतच पराभव झाल्याने, त्याचे स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे. समीर याला सिंगापूरचा खेळाडू कीन येउ लोह याच्याकडून एक तास एक मिनिट रंगलेल्या सामन्यात २१-१५, १५,-२१, १०-२१ ने पराभूत व्हावे लागले.

महिला दुहेरीत मेघना जक्कमपुडी आणि एस. पूर्विशा राम जोडीने डायना कोर्लेटो सोटो आणि निकटे अ‍ॅलेजँड्रा सोटोमेयर जोडीचा २१-१०, २१-१८ असा पराभव केला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.