बँकॉक - स्पेनची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती खेळाडू कॅरोलिना मारिन हिने थायलंड ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने कोरियाच्या सातव्या मानांकित ए से यंग हिचा पराभव केला.
मरिन आणि यंग यांच्यातील सामना रोमांचक राहिला. यातील पहिला गेम कॅरोलिया हिने २१-१९ अशा फरकाने जिंकला. यानंतर दुसरा गेम देखील तिने २१-१५ ने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.
मरिन जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. थायलंडमध्ये सलग दुसरी स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने तिने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. याआधी तिने मागील आठवड्यात खेळवण्यात आलेली बीडब्लूएफ सुपर १००० इव्हेंट स्पर्धा जिंकली होती.
दुसरीकडे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकाचे दावेदार सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे.
हेही वाचा - थायलंड ओपन सुपर १००० : कोरोनाच्या संसर्गामुळे साई प्रणीतची माघार
हेही वाचा - थायलंड ओपन : सात्विकसाईराज-चिरागचे आव्हान संपुष्टात