ETV Bharat / sports

ऑल इंग्लंड ओपन स्पर्धा : महिलामंध्ये तैवानची ताइ त्सू यिंग विजेती - ऑल इंग्लंड ओपन महिला एकेरीचे विजेतेपद न्यूज

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडावे लागले होते. जपानच्या नोझोमी ओकुहाराने सिंधूला १२-२१, २१-१५, २१-१३ असे हरवले.

Tai tzu ying won women's all england open title
ऑल इंग्लंड ओपन स्पर्धा : महिलामंध्ये तैवानची ताइ त्सू यिंग विजेती
author img

By

Published : Mar 18, 2020, 12:16 PM IST

बर्मिंगहॅम - तैवानची बॅडमिंटनपटू ताइ त्सू यिंगने तिसऱ्यांदा ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने चीनच्या चेन युफेईचा २१-१९, २१-१५ असा पराभव केला. हा सामना ४४ मिनिटे रंगला होता.

हेही वाचा - तब्बल ८ वर्षांपूर्वी सचिनच्या 'या' निर्णयाने क्रिकेटविश्व झाले होते भावूक!

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडावे लागले होते. जपानच्या नोझोमी ओकुहाराने सिंधूला १२-२१, २१-१५, २१-१३ असे हरवले. तर, सायना नेहवाल हिला सलामीच्या लढतीतच पराभव पत्करावा लागला होता. सायनाचा तिसऱ्या क्रमाकांच्या जपानच्या आकाने यामागुचीने २१-११, २१-८ असा पराभव केला होता.

पुरूषांमध्ये विक्टर एक्सेल्सेन विजेता -

डेन्मार्कच्या विक्टर एक्सेल्सेनने चिनी तैपेईच्या चेन चेन चौला मात देत ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे जेतेपद जिंकले. स्पर्धेच्या दुसऱ्या मानांकित एक्सेल्सेनने ४६ मिनिटांमध्ये पहिल्या मानांकित चौचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.