बासेल - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे स्वीस ओपन स्पर्धेचे विजेतपद पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अंतिम सामन्यात सिंधूचा पराभव झाला. स्पेनची रिओ ऑलिम्पिक विजेती खेळाडू कॅरोलिना मरिन हिने सिंधूचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मरिन हिने ३५ मिनिटात सिंधूचा पराभव केला. तिने २१-१२, २१-५ अशा फरकाने सामना जिंकला.
-
YONEX Swiss Open 2021 (New Dates)
— BWFScore (@BWFScore) March 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
WS - Final
21 21 🇪🇸Carolina MARIN🏅
12 5 🇮🇳V. Sindhu PUSARLA
🕗 in 35 minutes
https://t.co/jeacFDs1Mg
">YONEX Swiss Open 2021 (New Dates)
— BWFScore (@BWFScore) March 7, 2021
WS - Final
21 21 🇪🇸Carolina MARIN🏅
12 5 🇮🇳V. Sindhu PUSARLA
🕗 in 35 minutes
https://t.co/jeacFDs1MgYONEX Swiss Open 2021 (New Dates)
— BWFScore (@BWFScore) March 7, 2021
WS - Final
21 21 🇪🇸Carolina MARIN🏅
12 5 🇮🇳V. Sindhu PUSARLA
🕗 in 35 minutes
https://t.co/jeacFDs1Mg
पहिल्या गेममध्ये मरिन पहिल्या ब्रेकपर्यंत ११-८ ने आघाडीवर होती. ब्रेकनंतर मरिनने आक्रमक खेळ करत १९-१० असा फरक निर्माण केला. मरिन समोर सिंधू हतबल ठरली. अखेरीस पहिला गेम मरिनने २१-१२ च्या फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तर तिने सिंधूला आव्हानच उभारू दिले नाही.
आतापर्यंत हे दोन खेळाडू १४ वेळा समोरासमोर आले आहेत. यात नऊ वेळा मरिनने विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात सिंधूने बाजी मारली आहे. सिंधूने मरिनला २०१८ साली मलेशिया ओपन स्पर्धेत पराभूत केले होते.
दरम्यान, सिंधूने डेन्मार्कची मिया ब्लिचफेल्ट हिचा उपांत्य फेरीत सरळ गेममध्ये पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण तिला स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आलं नाही.
हेही वाचा - बॅडमिंटन : विक्टरने जिंकली स्वीस ओपन स्पर्धा
हेही वाचा - सिंधुने 'या' कारणामुळे सोडली गोपीचंद बॅडमिंटन अकादमी