ETV Bharat / sports

Thailand Open : सात्विक चिरागची भारतीय जोडी अंतिम फेरीत धडक

author img

By

Published : Aug 3, 2019, 9:42 PM IST

भारतीय जोडीने कोरियन जोडीचा २२-२०, २२-२४, २१-०९ असा पराभव केला. अंतिम फेरीत भारतीय जोडीसमोर तिसऱ्या मानांकित चीनच्या ली जुन हुई आणि ल्यू यु चेन या जोडीचे आव्हान असणार आहे. हा सामना उद्या विवारी रंगणार आहे.

Thailand Open : सात्विक चिरागची भारतीय जोडी अंतिम फेरीत धडक

बँकाक - थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सात्विकराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने कोरियन प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरी गाठली. या जोडीने कोरियन जोडीचा २२-२०, २२-२४, २१-०९ असा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांना तिसऱ्या मानांकित चीनच्या ली जुन हुई आणि ल्यू यु चेन या जोडीचे आव्हान असणार आहे. हा सामना उद्या रविवारी रंगणार आहे.

सामन्यात पहिल्या सेटमध्ये कोरियन जोडीने आक्रमक सुरुवात करत ३-० ने आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय जोडीने मध्यांतरापर्यंत सामना बरोबरीत आणला. मध्यांतरापर्यंत कोरियन जोडी ११-१० अशी आघाडीवर होती. मात्र, मध्यांतरानंतर भारतीय जोडीने दमदार पुनरागमन करत कोरियन जोडीला जेरीस आणले आणि पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोड्यांनी दमदार खेळ केला. मात्र, कोरियन जोडीने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत दुसरा सेट २२-२४ ने जिंकला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने कोरियन जोडीला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. शेवटचा तिसरा सेट भारतीय जोडीने २१-९ च्या फरकाने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

Intro:Body:

sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.