ऑकलंड (न्यूझीलंड) - बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला न्यूझीलंड ओपन बॅडमिंटनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसलाय. या पराभवासह सायनाचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
न्यूझीलंड ओपनच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत 212 व्या स्थानी असलेल्या चीनच्या वांग झेईने सायनाला 21-16, 21-23, 21-4 असा पराभवाचा धक्का देत स्पर्धेत मोठा उलटफेर केला. झेई आणि सायना या दोघी प्रथमच बॅडमिंटन कोर्टवर आमनेसामने आले होते.
सायनाव्यतिरीक्त महिला ऐकेरीत दुसरी भारतीय खेळाडू अनुरा प्रभुदेसाईलाही पराभवाचा सामना करावा लागला. तीला चीनच्याच ली जुरेईने अवघ्या 20 मिनिटांत 21-9 21-10 असे पाराभूत केले.