पॅरिस - भारताची फुलराणी सायना नेहवालने ओरलियान्स मास्टर बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरूवात केली. तिने पहिल्या फेरीत आयरलँडच्या रशेल डाराग हिचा सरळ गेमममध्ये पराभव केला. पुरूष एकेरीत श्रीकांतने दुसऱ्या फेरीत भारताच्याच अजय जयरामचा पराभव करत तिसरी फेरी गाठली आहे.
सायनाने रशेलचा २१ मिनिटात २१-९, २१-५ असा धुव्वा उडवला. दरम्यान सायना अद्याप टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली नाही. तिला विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी नोंदवत ऑलिम्पिकचे तिकिट मिळावण्याची संधी आहे.
किदाम्बी श्रीकांतला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना भारताच्याच अजय जयरामशी झाला. या सामन्यात श्रीकांतने जयरामचा १९-२१, २३-२१, २१-१६ अशा फरकाने पराभव केला.
हेही वाचा - रोमांचक सामन्यात ली झी जियाने अॅक्सलसेनचा पराभव करत जिंकली इंग्लंड ओपन स्पर्धा
हेही वाचा - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात