ETV Bharat / sports

चीन ओपन : प्रणीत सोबत भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात - sai praneeth lost news

५५ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात प्रणीतला अँथनीकडून २१-१६, ६-२१, १६-२१ अशी हार पत्करावी लागली. पहिल्या सेटमध्ये प्रणीतने दमदार सुरुवात करत हा सेट २१-९ ने जिंकला होता. त्यानंतर मात्र, जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानी असलेल्या अँथनीने पुढच्या दोन सेटमध्ये दमदार कामगिरी केली.

चीन ओपन : प्रणीत सोबत भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
author img

By

Published : Sep 20, 2019, 5:28 PM IST

नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी. साई प्रणीतने चीन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत त्याला इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुकाने पराभूत केले. या पराभवाबरोबरच भारताचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

sai praneeth
बी. साई प्रणीत

हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : सुशील कुमार पहिल्याच फेरीत गारद

५५ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात प्रणीतला अँथनीकडून २१-१६, ६-२१, १६-२१ अशी हार पत्करावी लागली. पहिल्या सेटमध्ये प्रणीतने दमदार सुरुवात करत हा सेट २१-९ ने जिंकला होता. त्यानंतर मात्र, जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानी असलेल्या अँथनीने पुढच्या दोन सेटमध्ये दमदार कामगिरी केली.

तिसऱ्या सेटमध्ये प्रणीतने पुनरागमनाचा प्रयत्न केला. १२-७ ने प्रणीत या सेटमध्ये पुढे होता. मात्र, अँथनीने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना २१-१६ ने खिशात घातला.

सिंधुला पराभवाचा धक्का -

नुकतीच विश्वविजेती ठरलेली भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा चायना ओपन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत धक्कादायक पराभव झाला. थायलंडच्या पोर्न्पावी चोचुवाँगने सिंधूला १२-२१, २१-१३, २१-१९ ने पराभूत केले. ५८ मिनिटे रंगलेल्या सामन्यात थायलंडची खेळाडू पोर्न्पावी चोचुवाँगने सिंधूवर विजय मिळवला.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.