नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या सिंधला मोठा धक्का लागला आहे. सिंधूची प्रशिक्षक किम जिहुयान यांनी आपला राजीनामा दिला आहे. दक्षिण कोरियन प्रशिक्षक किम जिहुयान यांनी आपल्या कौटुंबिक कारणामुळे राजीनामा दिला आहे
हेही वाचा -विराटला आली धोनीची आठवण, 'या'साठी रोहित शर्माकडे मागितली मदत
जिहुयान यांचे पती रिची मॅर यांना एका आजारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी जिहुयान यांना ४ ते ६ महिने घरी थांबावे लागण्याची शक्यता आहे. या कारणामुळे त्यांनी सिंधुची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
जिहुयान यांनी आपले राजीनामा पत्र सादर केले. या वर्षाच्या सुरूवातीला भारतीय बॅडमिंटन महासंघाने महिलांच्या एकेरीसाठी प्रशिक्षक म्हणून जिहुयान यांची नियुक्ती केली होती. ऑलिम्पिक स्पर्धा काही महिन्यांवर आली असताना जिहुयान यांच्या राजीनाम्यामुळे सिंधुला धक्का बसला आहे.
सिंधु म्हणाली, 'माझ्यासाठी हा अनपेक्षित धक्का आहे. मात्र, प्रत्येकास आपल्या कुटुंबियांना प्राधान्य देण्याची आवश्यकता असते. त्यांचे पती लवकर बरे होतील अशी मला आशा आहे.'