ETV Bharat / sports

सायना आणि इरा ओरलियान्स मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल - सायना नेहवाल

भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि इरा शर्मा या दोघींनी ओरलियान्स मास्टर्स स्पर्धेच्या महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

orleans-masters-badminton-saina-nehwal-ira-enter-quarter-finals
सायना आणि इरा ओरलियान्स मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल
author img

By

Published : Mar 25, 2021, 6:29 PM IST

ऑर्लियन्स (फ्रान्स) - भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि इरा शर्मा या दोघींनी ओरलियान्स मास्टर्स स्पर्धेच्या महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष दुहेरीत एमआर अर्जून आणि ध्रुव कापिला या जोडीने देखील उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.

सायनाने राउंड १६ मध्ये फ्रान्सची मारिए बातेमेने हिचा १८-२१, २१-१५, २१-१० ने पराभव केला. तर इराने बुल्गारियाच्या मारिया मितसोवा हिचा २१-१८, २१-१३ ने धुव्वा उडवला.

पुरूष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने तिसरी फेरी गाठली आहे. त्याने दुसऱ्या फेरीत भारताच्याच अजय जयराम याचा २१-१५, २१-१० ने पराभ केला होता.

अर्जून आणि कापिला या पुरुष जोडीने इंग्लंडच्या रोरी एस्टोन आणि झाक रुस यांचा पराभव केला. दरम्यान, याआधी भारताची महिला दुहेरी जोडी अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अश्विनी-सिक्की जोडीला इंडोनेशियांच्या फेबरियाना कुसुमा आणि अमलिया प्रतिवी यांच्याविरुद्धच्या सामन्यात पुढे चाल मिळाली आहे.

हेही वाचा - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात

हेही वाचा - भारताच्या माजी बॅडमिंटनपटूला ब्रेन ट्यूमर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.