ETV Bharat / sports

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणं हेच मुख्य ध्येय - सिंधू - टोकियो ऑलिम्पिक २०२०

२०१९ मध्ये विश्वविजेतेपदाचा किताब जिंकणारी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले.

olympic gold medal is my prime target in 2020 says world champion pv sindhu
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणं मुख्य ध्येय - सिंधू
author img

By

Published : Jan 2, 2020, 12:51 PM IST

नवी दिल्ली - २०१९ मध्ये विश्वविजेतेपदाचा किताब जिंकणारी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. विश्वविजेतेपदाचा किताब जिंकल्यानंतर सिंधूला त्यानंतरच्या स्पर्धांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यामुळे तिच्यावर टीका झाली. तेव्हा तिने मी टीकेला घाबरत नसल्याचे सांगितले.

वृत्तसंस्थेशी बोलताना सिंधूने सांगितले की, 'ऑलम्पिकमध्ये सुवर्णदक जिंकणे हे माझे मुख्य लक्ष्य असणार आहे. यानंतर जगातील सर्वोकृष्ठ खेळाडू होणे, हे माझे परम ध्येय असेल. तसेच यासह सुपर सीरीजही जिंकायची आहे.'

olympic gold medal is my prime target in 2020 says world champion pv sindhu
पी. व्ही. सिंधू

सुमार कामगिरीनंतर टीकेला सामोरे जावे लागले, याविषयी सिंधूला विचारले असताना तिने सांगितले की, 'मी टीकेला घाबरत नाही. टीका किंवा अपेक्षांचे ओझे माझ्या वाटचालीत अडसर ठरणार नाहीत. यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी स्वत:चा खेळ सुधारण्यावर भर देत आहे.'

जागतिक अजिंक्यपद माझ्यासाठी शानदार ठरली. यानंतरच्या स्पर्धांमध्ये मी पहिल्या फेरीत पराभूत होत गेले. पण मी पराभवानंतरही सकारात्मक राहीले. मी चुकांमधून मोठा बोध घेतला असून माझ्यासाठी सकारात्मक भाव बाळगून दमदार पुनरागमन महत्त्वाचे आहे, असेही सिंधूने सांगितले.

दरम्यान, सिंधूने २०१९ मध्ये विश्व विजेतेपदाचा किताब जिंकला. मात्र त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये सिंधू सुरुवातीचा अडथळा पार करू शकली नव्हती. मागच्या महिन्यात झालेल्या विश्व टूर फायनल्समध्येही सिंधू जेतेपदाचा बचाव करण्यात अपयशी ठरली होती.

हेही वाचा - पी.व्ही. सिंधू अत्यंत असंवेदनशील; गरज असेल तेव्हाच बोलते, माजी प्रशिक्षकाचे खळबळजनक आरोप

हेही वाचा - बॅडमिंटनपटू साई प्रणीतचा पार पडला साखरपुडा, ८ डिसेंबरला होणार लग्न

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.