नवी दिल्ली - रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन आणि स्पेनची दिग्गज बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरिनच्या वडिलांचे निधन झाले आहे. मरिनचे वडील गोंझालो मरिन पेरेझ हे काही महिन्यांपासून आजारी होते.
स्पॅनिश बॅडमिंटन फेडरेशनने (एफईएसबीए) दिलेल्या वृत्तानुसार, मरिनच्या वडिलांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. फेडरेशनने कॅरोलिना मरिनचे वडील गोंझालो मरिन पेरेझ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या अपघातानंतर त्यांनी बराच काळ संघर्ष केला. ते बरे झाले नाहीत. रविवारी त्यांचा मृत्यू झाला", असे एफईएसबीएने सांगितले.
फेडरेशनने पुढे सांगितले, "स्पॅनिश बॅडमिंटनने या कठीण क्षणांमध्ये कॅरोलिना मरिन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पाठिंबा दर्शवला आहे." 27 वर्षीय मरिनने गेल्या महिन्यात प्रशिक्षण सुरू केले आहे. मरिनला आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या जेतेपदाचा बचाव करणार आहे.