नवी दिल्ली - भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन डेन्मार्क ओपन सुपर ७५० स्पर्धेच्या दुसर्या फेरीसाठी पात्र ठरला आहे. मंगळवारी लक्ष्यने फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्हचा २१-९, २१-१५ असा सरळ पराभव करत ही फेरी गाठली.
-
The first match was lit 🔥
— BWF (@bwfmedia) October 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
How do you feel?#HSBCBWFbadminton #BWFWorldTour #DenmarkOpen2020 pic.twitter.com/QjEZfixjCj
">The first match was lit 🔥
— BWF (@bwfmedia) October 13, 2020
How do you feel?#HSBCBWFbadminton #BWFWorldTour #DenmarkOpen2020 pic.twitter.com/QjEZfixjCjThe first match was lit 🔥
— BWF (@bwfmedia) October 13, 2020
How do you feel?#HSBCBWFbadminton #BWFWorldTour #DenmarkOpen2020 pic.twitter.com/QjEZfixjCj
जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेल्या सेनने ३६ मिनिटांत हा सामना जिंकला. दुसर्या फेरीमध्ये लक्ष्यला डेन्मार्कच्या विट्टिंगसचा सामना करावा लागू शकतो. तीन वर्षांपूर्वी येथे विजेतेपद जिंकणारा किदांबी श्रीकांत इंग्लंडच्या टोबी पेंटीविरुद्धच्या सामन्यापासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
तर, अजय जयराम कॅनडाच्या जेसन अँथनीविरुद्ध आणि शुभांकर डे अँडर्स अँटोनसनशी खेळून आपल्या मोहिमेची सुरूवात करेल. वर्ल्ड बॅडमिंटन असोसिएशनने (बीडब्ल्यूएफ) यापूर्वी डेन्मार्क मास्टर्स तसेच थॉमस आणि उबर कप फायनल स्पर्धा रद्द केली आहे.