ETV Bharat / sports

अश्विनी पोनप्पा आणि लक्ष्य सेन प्रशिक्षणासाठी मैदानात - Lakshya sen training news

या दोघांव्यतिरिक्त अजय जयराम, मिथुन मंजुनाथ, बीएम राहुल भारद्वाज आणि मेसनम मीराबा हेदेखील प्रशिक्षण घेत आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) गेल्या महिन्याच्या अखेरीस प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी नियम तयार केले होते. पीपीबीएचे मुख्य प्रशिक्षक आणि संचालक विमल म्हणाले, “काही अव्वल राष्ट्रीय खेळाडू गेल्या दोन आठवड्यांपासून प्रशिक्षण घेत आहेत. आमच्याकडे 16 कोर्ट आहेत आणि 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी विविध सत्रे तयार केली आहेत. आमच्या 65 प्रशिक्षणार्थींपैकी बहुतेक सध्या शहरात नाहीत. ते येथे येऊन प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहे.''

Lakshya sen and ashwini ponnappa returns to training in padukone academy
अश्विनी पोनप्पा आणि लक्ष्य सेन प्रशिक्षणासाठी मैदानात
author img

By

Published : Jun 5, 2020, 6:51 PM IST

बंगळुरू - भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि लक्ष्य सेन यांनी बंगळुरूच्या प्रकाश पादुकोन बॅडमिंटन अकादमीमध्ये (पीपीबीए) सरावाला सुरूवात केली आहे. या दोघांसह 20 बॅडमिंटनपटू येथे प्रशिक्षण घेत आहेत.

या दोघांव्यतिरिक्त अजय जयराम, मिथुन मंजुनाथ, बीएम राहुल भारद्वाज आणि मेसनम मीराबा हेदेखील प्रशिक्षण घेत आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) गेल्या महिन्याच्या अखेरीस प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी नियम तयार केले होते. पीपीबीएचे मुख्य प्रशिक्षक आणि संचालक विमल म्हणाले, “काही अव्वल राष्ट्रीय खेळाडू गेल्या दोन आठवड्यांपासून प्रशिक्षण घेत आहेत. आमच्याकडे 16 कोर्ट आहेत आणि 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी विविध सत्रे तयार केली आहेत. आमच्या 65 प्रशिक्षणार्थींपैकी बहुतेक सध्या शहरात नाहीत. ते येथे येऊन प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहे.''

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) गुरुवारी 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान होणारी हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा रद्द केली आहे. ही स्पर्धा बीडब्ल्यूएफच्या सुधारित वेळापत्रकाचा एक भाग होती.

हैदराबाद ओपनशिवाय ऑस्ट्रेलियन ओपन, कोरिया मास्टर्स स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर जर्मन ओपन, स्विस ओपन आणि युरोपियन मास्टर्सला तहकूब करण्यात आले असून येत्या काळात या स्पर्धांवर निर्णय घेणार असल्याचे बीडब्ल्यूएफने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.