क्वालालंपूर - जगातील पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू केंटो मोमोटाने येत्या आठवड्यात बॅडमिंटनमध्ये परतणार असल्याचे जाहीर केले आहे. जानेवारीत जपानचा स्टार बॅडमिंटनपटू असलेल्या केंटोचा अपघात झाला होता.
हेही वाचा - तब्बल १४ वर्षांनंतर आफ्रिकेचा संघ करणार पाकिस्तान दौरा!
जानेवारीत मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर केंटो घरी येत होता. तेव्हा विमानतळावरून त्याला घेऊन निघालेल्या कारचा अपघात झाला. एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. दोन वेळा विश्वविजेतेपद मिळवणारा केंटो डिसेंबरच्या अखेरीस टोकियो येथे होणाऱ्या ऑल जपान राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेईल.
केंटो म्हणाला, "माझ्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला जवळपास एक वर्ष झाले आहे. आता मी ऑल जपान राष्ट्रीय स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. मला आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरूद्ध खेळायचे आहे.''
क्रीडा प्रशासकीय मंडळाच्या म्हणण्यानुसार, बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंची यादी थायलंड ओपनच्या समारोपानंतर निश्चित होईल. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र होण्यासाठी थायलंड ओपन स्पर्धेत प्रवेश करणे बंधनकारक आहे.