मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या संकटाशी झुंज देत आहे. कोरोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला आहे. तसेच सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यामुळे सर्व खेळाडू आपापल्या घरात कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत. अशात भारताची ग्लॅमरस बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला तिचा बॉयफ्रेंड अभिनेता विष्णू विशालची आठवण येत आहे.
ज्वालाने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ज्वालाने आपला बॉयफ्रेंड विष्णूबरोबरचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोवर मला तुझी आठवण येते, असे ज्वालाने लिहिले आहे.
-
Missing my boo 🙄😑 pic.twitter.com/IPQoQUgpSB
— Gutta Jwala (@Guttajwala) March 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Missing my boo 🙄😑 pic.twitter.com/IPQoQUgpSB
— Gutta Jwala (@Guttajwala) March 28, 2020Missing my boo 🙄😑 pic.twitter.com/IPQoQUgpSB
— Gutta Jwala (@Guttajwala) March 28, 2020
यावर ज्वालाचा बॉयफ्रेंड विष्णूनेही झकास रिप्लाय दिला. सध्या सारं ठीक आहे. पण आता सोशल डिस्टंस गरजेचे आहे. त्यामुळे आपण सगळ्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करूया, अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे. यासोबत त्याने मिठी मारण्याचा इमोजीही त्यात वापरला आहे.
-
Its oki..Right now social distancing is important..🙏pray for all...🤗 https://t.co/al7iPw261N
— VISHNU VISHAL - VV (@TheVishnuVishal) March 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Its oki..Right now social distancing is important..🙏pray for all...🤗 https://t.co/al7iPw261N
— VISHNU VISHAL - VV (@TheVishnuVishal) March 28, 2020Its oki..Right now social distancing is important..🙏pray for all...🤗 https://t.co/al7iPw261N
— VISHNU VISHAL - VV (@TheVishnuVishal) March 28, 2020
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनबरोबर ज्वालाचे अफेअर असल्याचे म्हटले जात होते. सध्याच्या घडीला तिचे अफेअर हे अभिनेता विष्णू विशालबरोबर आहे.
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. भारतालाही याचा फटका बसला असून देशात कोरोना रुग्णांची संख्या १२५१ झाली आहे. तर ३२ जणांचा यात मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने उपाययोजन करत आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे.
हेही वाचा - कोरोनाविरुद्धची लढाई : पवन कल्याणकडून २ कोटींची मदत, सिंधूचाही मदतीचा हात
हेही वाचा - कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी महिला क्रिकेटपटू सरसावल्या, मितालीसह यांनी दिली मदत