मुंबई - भारतीय महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा कधी लग्न करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये होती. अखेर ज्वालाने आज सोशल मीडियावर ती अभिनेता विष्णू विशालशी कधी लग्न करणार आहे, हे सांगितलं आहे. ज्वाला आणि विष्णू २२ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
आज सोशल मीडियावर ज्वाला आणि विष्णू या दोघांनी त्यांच्या लग्नाची तारीख सांगितली. ज्वाला आणि विष्णू या दोघांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन लग्न पत्रिका पोस्ट केली आहे.
- — Gutta Jwala (@Guttajwala) April 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Gutta Jwala (@Guttajwala) April 13, 2021
">— Gutta Jwala (@Guttajwala) April 13, 2021
दरम्यान, हे लग्न अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित होणार आहे. यात जवळचे नातेवाईक सहभागी होणार आहेत.
विशाल आणि ज्वाला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे त्यांच्या सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असताना अनेकदा पाहायला मिळाले आहेत.
-
N dis happened last nite n what a beautiful surprise it was!
— Gutta Jwala (@Guttajwala) September 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Today when I think of my life what a journey it has been n 2day I realise there is so much more to luk forward to!Towards our family,Aryan,friends and work!its gonna be another great journey am sure ❤️🥂😘 pic.twitter.com/qjqVkK6CWo
">N dis happened last nite n what a beautiful surprise it was!
— Gutta Jwala (@Guttajwala) September 7, 2020
Today when I think of my life what a journey it has been n 2day I realise there is so much more to luk forward to!Towards our family,Aryan,friends and work!its gonna be another great journey am sure ❤️🥂😘 pic.twitter.com/qjqVkK6CWoN dis happened last nite n what a beautiful surprise it was!
— Gutta Jwala (@Guttajwala) September 7, 2020
Today when I think of my life what a journey it has been n 2day I realise there is so much more to luk forward to!Towards our family,Aryan,friends and work!its gonna be another great journey am sure ❤️🥂😘 pic.twitter.com/qjqVkK6CWo
कोण आहे विशाल?
विष्णू विशाल हा तमिळ सिनेमाचा एक मोठा स्टार आहे. चित्रपटाच्या जगाशिवाय तो आपल्या भव्य शरीर यष्टीबाबत खूप चर्चेत असतो. तो लवकरच दक्षिणेतील सर्वात मोठा सुपरस्टार असणाऱ्या राणा दुग्गूबातीसमवेत 'अरण्या' या चित्रपटात दिसणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पहिल्या लग्नानंतर दोघांचेही घटस्फोट
विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा या दोघांनी पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतलेला आहे. विशालने प्रथम रजनीशी लग्न केले. इतकेच नाही तर त्याला एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव आर्यन आहे. तथापि, मतभेदांमुळे या दोघांचा घटस्फोट २०१८ मध्ये झाला. त्याच वेळी ज्वालाचे चेतन आनंदशी लग्न झाले आणि २०११ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - इंडिया ओपन : मरिन आणि मोमोटा सारखे मोठे खेळाडू होणार सहभागी
हेही वाचा - बीडब्ल्यूएफ ११ गुणांचे पाच गेम खेळवण्याचा विचारात