ग्वांगजू - भारताचा आघाडीचा पुरूष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने नुकत्याच सुरू झालेल्या कोरिया मास्टर्स स्पर्धेमध्ये विजयी आरंभ केला. श्रीकांतने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या विसेन्तेच्या वोंग विंगचा २१-१८, २१-१७ असा पराभव केला.
हेही वाचा - युवराजवर 'हा' संघ बोली लावण्यास उत्सुक !
जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या श्रीकांतने संपूर्ण सामन्यात विंगवर वर्चस्व ठेवले. जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानी असलेल्या पानच्या कांता तुसेनेमाशी श्रीकांतचा पुढील सामना होणार आहे.
दुसरीकडे, भारताच्या सौरभ वर्माला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. कोरियाच्या किम डोंगहुनकडून सौरभला १३-२१, २१-१२, २१-१३ असा पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी, भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धेत श्रीकांतला पराभव पत्कारावा लागला होता. उपांत्य फेरीच्या ४२ मिनिटे चाललेल्या सामन्यात चेयुकने जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असलेल्या श्रीकांतला २१-९, २५-२३ अशी मात दिली होती. या स्पर्धेचे जेतेपद हाँगकाँगच्या ली चेयुकने पटकावले आहे.