हैदराबाद - जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेची विजेती तथा भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आज 'ईटीव्ही भारत'शी दिलखुलास गप्पा मारल्या. तिने टोकियो ऑलिम्पिंकसह हैदराबाद हंटरसोबतचा प्रवास यावेळी सांगितला.
आगामी टोकियो ऑलिम्पिकविषयी सिंधूने सांगितले की, 'ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी सामने सुरू आहेत. यामुळे प्रत्येक स्पर्धा महत्वाची आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे सोप्प नाही, पण यासाठी सर्व खेळाडू स्वतःला झोकून देत आहेत.'
लोकांना तुझ्याकडून खूप आपेक्षा आहेत याविषयी तु काय सांगशील असे विचारल्यानंतर सिंधू म्हणाली, 'लोक जेव्हा मला सपोर्ट करतात. हे पाहून मला खरचं चांगलं वाटतं. हार-जीत तर खेळाचा भाग आहे. पण प्रेशरच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, लोकांच्या आपेक्षा माझ्यासाठी प्रेशर नसून जबाबदारी वाटते. मी जेव्हा कोर्टवर जाते. तेव्हा सर्वोत्तम खेळ करण्याचा माझा उद्देश असतो.'
बॅडमिंटन माझ्यासाठी पॅशन आहे. यामुळे मला कधी हे अडचणीचे वाटले नाही. तसेच काही मिळवण्यासाठी काही बाबीचा त्याग करावा लागतो, असेही सिंधूने सांगितलं. तसेच तिने पीबीएलमध्ये हैदराबाद हंटरसोबत दोन वर्ष जोडली गेल्याने आनंद व्यक्त केला. तिने सांगितले की, होम टीमसाठी खेळण्याचा आनंद हा निराळाच असतो.
पी. व्ही. सिंधूने 'ईटीव्ही भारत'च्या ऑफिसला भेट दिली. यावेळी तिच्यासोबत हैदराबाद हंटरचे मालक डॉ. वी. के. राव हेही उपस्थित होते.
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी
हेही वाचा - सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!