ओडेन्से (डेन्मार्क) : - डेन्मार्क ओपन स्पर्धेत भारताचा अव्वल पुरूष बॅडमिंटन खेळाडू पारूपल्ली कश्यपचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला. नुकतीच पार पडलेल्या कोरिया ओपन स्पर्धेत कश्यपने उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे भारतीयांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, त्याचा थायलंडच्या सिट्टहीकोम थाम्मासिनने पराभव केला.
थायलंडच्या सिट्टहीकोम थाम्मासिनने कश्यपचा २१-१३, २१-१२ ने पराभव केला. सामन्याच्या सुरूवातीपासूनच थाम्मासिनने आक्रमक खेळ केला. त्याने मारलेल्या फटक्यांपुढे कश्यपचा निभाव लागला नाही. कश्यपसह भारताचा दुसरा बॅडमिंटनपटू सौरभ वर्मालाही सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला आहे.
राष्ट्रीय विजेत्या सौरभ वर्माने चालू वर्षात हैदराबाद आणि व्हिएटनाम ओपन स्पर्धा जिंकली आहे. यामुळे सौरभकडूनही विजयाची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, नेदरलँडच्या खेळाडूने त्याला पहिल्या फेरीत पराभवाचा दणका दिला आणि स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आणले. नेदरलँडचा मार्क कॅलजोऊवने सौरभचा १९-२१, २१-११, २१-१७ असा पराभव केला.
हेही वाचा - १८ वर्षीय लक्ष्य सेनची डच ओपनच्या अंतिम सामन्यात धडक
हेही वाचा - सायना नेहवाल संकटात!..नाराज होऊन केले परराष्ट्र खात्याला ट्विट