हैदराबाद - भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने बुधवारी भाजमध्ये प्रवेश केला. तिच्या भाजप प्रवेशावर बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने तिचे नाव न घेता निशाणा साधला आहे.
सायनाने तिची मोठी बहिण चंद्रांशू नेहवाल हिच्यासह भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी तिने सांगितले की, 'मी खूप मेहनती असून मला मेहनती लोक आवडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी अथक काम करत आहेत. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझ्य भाग्य समजते.'
ज्वाला गुट्टाने सायनाच्या भाजप प्रवेशाच्या काही तासातच तिच्यावर निशाणा साधला आहे. कोणी विनाकारण पक्षाशी जोडले गेले, हे मी पहिल्यांदाच ऐकते आहे, अशा आशयाने ज्वाला गुट्टाने नाव न घेता सायना नेहवालला टोला लगावला आहे. तिने यासंदर्भात एक ट्वीट केले आहे.
-
Pehli baar Suna hai...bewajah khelna shuru kiya aur ab bewajah party join kiya... 🤔 🧐
— Gutta Jwala (@Guttajwala) January 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pehli baar Suna hai...bewajah khelna shuru kiya aur ab bewajah party join kiya... 🤔 🧐
— Gutta Jwala (@Guttajwala) January 29, 2020Pehli baar Suna hai...bewajah khelna shuru kiya aur ab bewajah party join kiya... 🤔 🧐
— Gutta Jwala (@Guttajwala) January 29, 2020
हेही वाचा - भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल भाजपमध्ये
हेही वाचा - ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणं हेच मुख्य ध्येय - सिंधू