ETV Bharat / sports

भारताच्या बॅडमिंटनपटूला डेन्मार्कच्या विमानात बसण्यापासून रोखले - danish flight and indian badminton player

बॅडमिंटनपटू अजय जयरामकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असूनही त्याला डेन्मार्कच्या विमानात बसण्यास मनाई करण्यात आली. जयराम डेन्मार्क ओपन सुपर सिरीजसाठी रवाना होणार होता.

Badminton player ajay jayaram stopped from boarding a danish flight
भारताच्या बॅडमिंटनपटूला डेन्मार्कच्या विमानात बसण्यापासून रोखले
author img

By

Published : Oct 10, 2020, 3:43 PM IST

नवी दिल्ली - भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामला डेन्मार्कच्या विमानात बसण्यापासून रोखण्यात आले आहे. जयराम डेन्मार्क ओपन सुपर सिरीजसाठी रवाना होणार होता. लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत आणि शुभंकर डे हे गुरुवार रात्री एअर फ्रान्सच्या विमानाने दिल्लीहून निघाले, तर जयराम शुक्रवारी सकाळी ब्रिटिश एअरवेज येथून रवाना होणार होता.

अजय जयरामकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असूनही त्याला या विमानात बसण्यास मनाई करण्यात आली. याबाबत जयरामने ट्विट केले आहे. तो म्हणाला, ''मला आज रात्री डेन्मार्क ओपन खेळण्यासाठी बंगळुरूहून डेन्मार्कला जायचे होते. माझ्याकडे सी प्रकारचा व्हिसा आणि आयोजकांचे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र आणि स्पर्धेचे पत्रही होते. मी एअर फ्रान्समधून जाऊ शकतो का?''

  • I wasnt allowed to board @British_Airways flight this morning. The rest of the Indian team has flown out with @airfrance last night from delhi having the same type c schengen visa as me. Kindly help @AirFranceIN

    — Ajay Jayaram (@ajay_289) October 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तो पुढे म्हणाला, "मला आज सकाळी ब्रिटिश एअरवेजने जायचे होते. उर्वरित भारतीय संघ काल रात्री एअर फ्रान्सहून दिल्लीला रवाना झाले. मला मदत करा." या ट्विटमध्ये त्याने क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केले आहे. ही स्पर्धा ओडेंसमध्ये १३ ते १८ ऑक्टोबर दरम्यान खेळली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.