ETV Bharat / sports

उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी

तामिळनाडूच्या रामनाथपूरम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे आठवड्याची बैठक घेत होते. या बैठकीत नागरिक त्यांचे अर्ज, विनंती अर्जाच्या रुपात जिल्हाधिकाऱ्यांना देत होते. तेव्हा ७० वर्षीय मलाईसामी या व्यक्तीने २४ वर्षांच्या पी. व्ही. सिंधूशी लग्न करण्यासंबंधीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

सौजन्य - ट्विटर
author img

By

Published : Sep 17, 2019, 8:08 PM IST

चेन्नई - विश्व चॅम्पियन बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला एका ७० वर्षीय व्यक्तीने लग्नासाठी मागणी घातली आहे. माझे सिंधूशी लग्न लावून द्या, अन्यथा मी तिचे अपहरण करेन, अशी धमकी त्या व्यक्तीने दिली आहे. मलाईसामी असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याने जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी एक अर्ज दिला आहे.

मलाईसामी हे तामिळनाडूच्या रामनाथपूरमचे रहिवासी आहेत. त्यांनी सिंधूसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली आहे.

पी. व्ही. सिंधू
मलाईसामी जिल्हाधिकारींना अर्ज देताना...

हेही वाचा - नागार्जुनच्या उपस्थितीत चामुंडेश्वरी नाथ यांनी दिली सिंधूला बीएमडब्ल्यू भेट

घडलं असं की, तामिळनाडूच्या रामनाथपूरम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे आठवड्याची बैठक घेत होते. या बैठकीत नागरिक त्यांचे अर्ज, विनंती अर्जाच्या रुपात जिल्हाधिकाऱ्यांना देत होते. तेव्हा ७० वर्षीय मलाईसामी या व्यक्तीने २४ वर्षाच्या पी. व्ही. सिंधूशी लग्न करण्यासंबंधीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस

जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज वाचला. तेव्हा त्यात त्या व्यक्तीने लिहलेल्या इच्छांचा उलगडा झाला. त्या अर्जात अर्जदाराने असेही म्हटले आहे की जर सिंधूसोबतच्या लग्नासाठी आवश्यकत्या गोष्टींची पुर्तता केली नाही तर तिचे अपहरण करेन. धक्कादायक म्हणजे सिंधूशी लग्न करण्यासाठी अर्ज करणाऱ्याने स्वत:चे वय १६ असल्याचा अजब दावा केला आहे. अर्जदाराने अर्जात स्वत:ची जन्मतारीख ४ एप्रिल २००४ अशी सांगितली आहे. दरम्यान, पी. व्ही. सिंधूने काहीच दिवसांपूर्वी जागतिक स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरलेली आहे.

Intro:Body:

Sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.