मुंबई - भारताच्या कबड्डी संघाचा कर्णधार अजय ठाकूरला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते अजय ठाकूरला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३२ वर्षाचा असलेल्या अजय ठाकूरने २०१६ साली अहमदाबाद येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यास महत्वाची भूमिका बजावली होती.
Delhi: President Ram Nath Kovind confers Padma Shri award upon Kabaddi team's captain Ajay Thakur. #PadmaAwards pic.twitter.com/XI3We7wUHE
— ANI (@ANI) March 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: President Ram Nath Kovind confers Padma Shri award upon Kabaddi team's captain Ajay Thakur. #PadmaAwards pic.twitter.com/XI3We7wUHE
— ANI (@ANI) March 11, 2019Delhi: President Ram Nath Kovind confers Padma Shri award upon Kabaddi team's captain Ajay Thakur. #PadmaAwards pic.twitter.com/XI3We7wUHE
— ANI (@ANI) March 11, 2019
अजय ठाकूरचा जन्म १ मे १९८६ साली दाभोटा, हिमाचल प्रदेश येथे झाला. अजय ठाकूरचे वडील राष्ट्रीय स्तरावरचे कुस्तीपटू होते. अजय ठाकूरनेही वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत राष्ट्रीय स्तरावर हिमाचलच्या कबड्डी संघात स्थान पटकावले. यानंतर त्याने भारताच्या राष्ट्रीय कबड्डी संघात स्थान मिळवले. त्याने भारताकडून इन्चियॉन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघाचा तो सदस्य होता.
भारतात २०१६ साली विश्वकरंडक स्पर्धेत त्याने चढाईत सर्वात जास्त ६८ गुणांची कमाई करताना मॅन ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. यानंतर, त्याने संघाचे नेतृत्व करताना २०१८ साली दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. प्रो कबड्डीतही त्याने आतापर्यंतच्या हंगामात विविध संघांकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे.