मुंबई- अभिनेत्री जारा खान हिला तिच्या सोशल माध्यमांवर बलात्काराची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे . गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री जारा खानला इन्स्टाग्राम सारख्या एका अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार करण्याची धमकी दिली जात होती. यासंदर्भात अभिनेत्रीने मुंबई पोलिसांच्या ओशिवारा पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.
धमकी देणारी आरोपी हैद्राबादमधली
ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर विभागाकडून या संदर्भात तपास केला जात होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या आयपी अॅड्रेसचा शोध घेत पोलिसांनी नुरह सरोवर (23) या एमबीए विद्यार्थिनीला हैद्राबाद येथून अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने सोशल माध्यमांवर बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवलेलं होतं. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक झालेली तरुणी ही मानसिक दृष्ट्या स्थिर नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांनी कलम 354 अ , 354 ब 509 , 506 या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - आमचे शेतकरी हे भारताचे अन्न सैनिक आहेत - प्रियंका चोप्रा