ETV Bharat / sitara

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत एतशा संझगिरी साकारणार तरुण अहिल्याबाई होळकर!

author img

By

Published : Aug 10, 2021, 3:27 PM IST

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या भव्य मालिकेत अहिल्याबाई होळकरचे जीवन चरित्र मांडले आहे. अभिनेत्री एतशा संझगिरी हिची तरुण अहिल्याबाई होळकरांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या १६ तारखेपासून एतशा संझगिरी तरुण अहिल्याबाईच्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येईल.

Punyashlok Ahilyabai on Sony TV
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत एतशा संझगिरी

१८ व्या शतकातील पितृसत्ताक समाजात महिलांसाठी शिक्षण वर्जित होते पण महिलांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या विरोधात अहिल्याबाई एक दुर्लभ आणि अनुकरणीय उदाहरण म्हणून उभी राहिली. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत काळाच्या पुढे विचार असलेल्या मुलीला, अहिल्याबाईला, तिचे सासरे मल्हार राव सतत समर्थन देत राहतात. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या भव्य मालिकेत अहिल्याबाई होळकरचे जीवन चरित्र मांडले आहे. अहिल्याबाई होळकर एक अशी स्त्री होती जिच्यात स्त्रीचे सामर्थ्य आणि धैर्य एकवटले होते. तिने त्याकाळी सर्व प्रतिकूलतांवर मात करून केवळ इतिहासच घडवला नाही तर येणार्‍या अनेक पिढ्यांसाठी ती प्रेरणास्रोत बनली.

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत काळ झपाट्याने ७ वर्षे पुढे सरकलेला दाखवण्यात येणार आहे आणि प्रेक्षक आता युवा अध्याय पाहणार आहेत. लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री एतशा संझगिरी हिची तरुण अहिल्याबाई होळकरांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील तिची उत्कृष्ट कामगिरी आणि या काळात तिला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम विचारात घेता, मालिकेतील या महत्त्वाच्या भूमिकेसाठी तिची निवड अगदी चपखल आहे असे वाटते. प्रेक्षकांना आता राणी अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातील नवीन अध्याय अनुभवायला मिळणार आहे.

आता अहिल्याबाईंच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण अध्याय उलगडणार आहे. स्वतःचा मार्ग शोधताना सगळ्या प्रतिकूलतांवर मात करत आणि समाजातील अनिष्ट रूढींवर विजय मिळवत भारतीय इतिहासातील एका महान महिला शासक बनण्याच्या कीर्तीपर्यंतची अहिल्याबाईंची वाटचाल या मालिकेतून दिसणार आहे. येत्या १६ तारखेपासून एतशा संझगिरी तरुण अहिल्याबाईच्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येईल.

या मालिकेसाठी निवड झाल्याचा आपला आनंद व्यक्त करताना एतशा संझगिरी म्हणाली, “‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही सध्या टेलिव्हिजनवरची प्रेक्षकांची अत्यंत लाडकी मालिका आहे आणि याचे श्रेय त्यातील उत्कृष्ट अभिनय आणि दमदार कथानकाला जाते. भारतीय इतिहासातील एक अत्यंत महान महिला शासक असलेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांचा वारसा प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य मानते. मला आशा आहे की, या प्रेरणामूर्ती असलेल्या स्त्रीचे चरित्र पडद्यावर उलगडून दाखवण्यात मी यशस्वी होईन आणि प्रेक्षक माझ्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा असाच वर्षाव करत राहतील. ही नवीन वाटचाल सुरू करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. खरोखर, माझे जणू स्वप्नच साकार झाले आहे!”

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होते.

हेही वाचा - प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारी शेवंता येतेय, पुन्हा एकदा, ‘रात्रीस खेळ चाले ३’ मधून!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.