ETV Bharat / sitara

'देशद्रोहा'चा आरोप झालेली अभिनेत्री आयशा सुल्ताना कोण आहे?

author img

By

Published : Jun 11, 2021, 5:00 PM IST

लक्षद्वीप बेटावर कोविड रुग्ण संख्येमध्ये अचानक वाढ झाल्याबद्दल अभिनेत्री आयशा सुल्तानाने एका चर्चेच्या वेळी स्थानिक प्रशासनाला 'बायो-वेपन' ('जैविक अस्त्र') म्हटले होते. अलिकडेच लक्षद्वीप बेट समुह प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांच्या प्रशासनातील बदलांच्या पार्श्वभूमीवर हे विधान तिने केले होते. स्थानिक भाजपा नेते अब्दुल खादर हाजी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिच्याविरूद्ध कावरट्टी पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aisha Sultana
आयशा सुल्ताना

एर्नाकुलम - भारताच्या लक्षद्वीप बेटावर राहणारी अभिनेत्री आयशा सुल्तानावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. बेटावर कोविड रुग्ण संख्येमध्ये अचानक वाढ झाल्याबद्दल तिने एका चर्चेच्या वेळी स्थानिक प्रशासनाला 'बायो-वेपन' ('जैविक अस्त्र') म्हटले होते.

टीव्ही शोमधील चर्चेच्या वेळी आयशाने हे विधान केले होते. अलिकडेच लक्षद्वीप बेट समुह प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांच्या प्रशासनातील बदलांच्या पार्श्वभूमीवर हे विधान तिने केले होते. याबाबत स्थानिक भाजपा नेते अब्दुल खादर हाजी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिच्याविरूद्ध कावरट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुल्ताना यांनी आपल्या या वक्तव्याचा बचाव केला आहे. ती म्हणाली, की तिचे हे म्हणणे पटेल यांच्या निर्णयावर आधारित आहे, देशाविषयी नाही.

"लक्षद्वीपवर कोविड -१९ची शून्य प्रकरणे होती. आता दररोज १०० प्रकरणांची नोंद होत आहे. असे आयशा सुल्ताना मल्याळम टीव्हीवरील चर्चेदरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणाली होती," असे अहवालात म्हटले आहे.

लक्षद्वीप बेटावर सुरू झालेल्या नव्या सुधारणांविरूद्धच्या मोहिमेमध्ये अभिनेत्री आयेशा सुल्तानाने भाग घेतला असून ती यासाठी सक्रिय बनली होती.

आयशा सुल्ताना कोण आहे?

आयशा सुल्ताना एक मॉडेल, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. लक्षद्वीप बेटाच्या इतिहासातील ती पहिली महिला चित्रपट निर्माती आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मल्याळम भाषेतील 'फ्लश' हा चित्रपट २०२० मध्ये आलेला एक स्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून तिचा पहिला चित्रपट होता.

सुल्तानाने लाल जोसेसह अनेक मल्याळम चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले आहे. तिने 'केट्टिओलानु एन्टे मालाखा' या चित्रपटात सह-दिग्दर्शिका म्हणूनही काम केले होते.

“माझी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आलेली आणखी एक व्यक्ती आता स्वतंत्र चित्रपट निर्मिती करत आहे. यावेळी लक्षद्वीपची आयशा सुल्ताना ही एक मुलगी आहे. तिच्या फ्लॅश चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना मला आनंद झाला आहे,” असे लाल जोसे यावेळी म्हणाले होते.

अलिकडेच एका स्थानिक बातमीमुळे आयेशा सुल्ताना चर्चेत आली होती. चित्रपट दिग्दर्शिका गीतू मोहनदास आणि महिला वेशभूषा डिझायनर स्टेफी झेवियर यांच्यातील वादात आयशाने स्टेफीचे समर्थन केले होते. त्यानंतर गीतू यांनी स्टेफीला आपल्या सिनेमातून डच्चू दिला होता आणि आयशाने तिला आपल्या फ्लश या चित्रपटासाठी साईन केले होते.

हेही वाचा - इटालियन आर्टिस्टनं विकलं 'अस्तित्वात' नसलेलं शिल्प; रितेश देशमुख म्हणतो, खरे कलाकार तर आम्हीच!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.