मुंबई - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो यामधील अतरंगी व्यक्तीरेखांमुळे वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या शोमध्ये दिलीप जोशी, मुनमुन दत्ता, शैलेश लोढासारखे कलाकार काम करतात. या शोमधील प्रत्येक व्यक्तीरेखेची आपली एक स्वतंत्र ओळख आहे. मात्र यात दयाबेन हे एकमेव असे पात्र आहे जे संवादफेकीमुळे लोकांना सतत हसवत ठेवते. दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानी या शोमध्ये पुनरागमन करणार की नाही यावरुन भरपूर चर्चा सुरू आहे. दिशाने २०१७ मध्ये गर्भवती असताना बाळंतपणाची रजा घेतली होती. त्यानंतर ती या शोमध्ये परत आलेली नाही. प्रेक्षक तिची खूप प्रतीक्षा करीत आहेत.
![Dayaben' aka Disha Wakani](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12235917_disha.jpg)
यापूर्वीही दिशाला रिप्लेस करण्याचा काही वेळा प्रयत्न झाला होता, अशा अफवा पसरल्या होत्या. निर्माते दयाबेनच्या जागी दुसऱ्या कलाकाराचा शोध घेत आहेत अशी चर्चाही ऐकायला मिळत आहे. दिशाने दयाबेनच्या भूमिकेला अशा उंचीवर नेऊन ठेवले आहे की तिची जागा दुसरी कोणी घेईल असे वाटत नाही. प्रेक्षकांनाही तिची जागा दुसरी कोणी घेतली तर पसंत पडेल का याबद्दलही शंका आहे.
'नागिन ४' ची अभिनेत्री राखी विजान दयाबेनची भूमिका करण्यासाठी उत्सुक होती. आपण ही भूमिका साकारु शकते असा आत्मविश्वास राखीला वाटत होता.
![Dayaben' aka Disha Wakani](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12235917_taarak-mehta-disha-vakani-t_202102557933.jpg)
दिव्यांका त्रिपाठीने 'खतरों के खिलाडी' हा शो नुकताच केपटाऊनमध्ये शूट केला आहे. ती भारतात परतली असून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोच्या निर्मात्यांनी तिला दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑफर दिल्याचे समजते. मात्र तिने ही भूमिका करण्यास नकार दिल्याचीही माहीती पुढे येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दयाबेनच्या भूमिकेसाठी दिशा वकानीहून अधिक चांगली अभिनेत्री मिळणे सध्यातरी निर्मात्यांना कठीण जात आहे. दिशा वकानीने तारक मेहता सोडली त्याला चार वर्षे झाली आहेत. ती पुरागमन करेल याच प्रतीक्षेत प्रेक्षक तर आहेतच पण निर्मात्यांनाही तसेच वाटत असल्याचे सध्यातरी वाटत आहे.
हेही वाचा - हर्षवर्धन कपूर आगामी रोमँटिक कॉमेडीमध्ये अलाया एफसोबत करणार रोमान्स?