मुंबई - गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे सगळी शुटिंग्स बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे मालिकेतील नवीन एपिसोड्स प्रेक्षकांना बघायला मिळत नव्हते. त्यांना ‘रिपीटस’ वरच समाधान मानावं लागत होते. आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागला असून कुठल्याही शूटिंगला परवानगी नाहीये. परंतु, निर्माते सजग झाले आहेत. त्यामुळेच जवळपास सर्व वाहिन्यांवरील सर्वच मालिकांच्या निर्मात्यांनी मालिकांचे चित्रीकरण तातडीने महाराष्ट्राबाहेर हलविले आहे. सब टीव्हीवरील ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से' ही मालिकेचे सर्व युनिट सिल्वासा मध्ये असून तिथे सर्व शूटिंग केलं जात आहे. फक्त वरिष्ठ कलाकारांना तूर्तास मुंबईतच राहण्यास सांगण्यात आले आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक सोनी सबवरील मालिका 'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से' नवीन एपिसोड्ससह परतत आहे. यात जुन्या आठवणींना उजाळा देत विलक्षण दैनंदिन कथांना सादर करणे सुरूच ठेवेल.
'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से' चे शूटिंग सिल्वासामध्ये! - sony sab tv
राज्यात पूर्णत: लॉकडाऊमुळे हिंदी मराठी मालिकांना चित्रीकरण करणे कठीण असल्याने निर्माते राज्याबाहेर शूटींग करत आहे. सोनी सबवरील मालिका 'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से' मालिकेचे संपूर्ण युनिट सिल्वासा येथून शूटिंग करत आहे.