ETV Bharat / sitara

अनन्या पांडेनंतर विजय देवरकोंडाला साकारायची 'या' अभिनेत्रींसोबत भूमिका - vijay Devarkona with ananya pande

विजय देवरकोंडा दक्षिण सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. 'अर्जून रेड्डी', 'गीता गोविंदम', 'डियर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटातून त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

Arjun Devarkona wants to work with Janhvi kapoor and Kiara Advani
अनन्या पांडेनंतर विजय देवरकोंडाला साकारायची 'या' अभिनेत्रींसोबत भूमिका
author img

By

Published : Mar 22, 2020, 12:58 PM IST

Updated : Mar 22, 2020, 1:21 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत आगामी चित्रपट 'फायटर'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अर्जुन हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अनन्या पांडेनंतर बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींसोबत भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे विजयने म्हटले आहे.

विजय देवरकोंडा दक्षिण सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. 'अर्जून रेड्डी', 'गीता गोविंदम', 'डियर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटातून त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे त्याला हिंदी चित्रपटात पाहण्याची चाहत्यांना आतुरता आहे. अलिकडेच विजयने अनन्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तसेच बॉलिवूडमध्ये कियारा आडवाणी आणि जान्हवी कपूर यांच्यासोबतची भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे त्याने बोलून दाखवले आहे.

हेही वाचा -रणवीरच्या '८३' वरही कोरोनाचे सावट, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

माध्यमांशी बोलत असताना तो म्हणाला, की 'बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्रीसोबत भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर, मला आनंदच आहे. त्यातही जान्हवी आणि कियारासोबत काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे'.

जान्हवी कपूरनेही 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात विजयसोबत भूमिका साकारण्याची इच्छा बोलून दाखवली होती. 'फायटर' चित्रपटात अनन्यापूर्वी जान्हवीचेच नाव चर्चेत होते. मात्र, अखेर या चित्रपटात अनन्याची वर्णी लागली. जगन्नाथ पुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -'मोस्ट डिझायरेबल मॅन'च्या यादीत विजय देवरकोंडा अव्वल

Last Updated : Mar 22, 2020, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.