मुंबई - क्रिकेट आणि कलाविश्व यांचे नाते वेळोवेळी काही ना काही कारणामुळे समोर येत असते. बऱ्याच क्रिकेटपटुंची नावं बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींशी जोडली गेली आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या हे देखील रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे दोघेही चर्चेत आले होते. पुढे त्यांच्यात दुरावा आला आणि ते वेगळे झाले. मात्र, आता पुन्हा एकदा एका व्हिडिओमुळे दोघेही माध्यमाच्या प्रसिद्धीझोतात आले आहेत.
उर्वशीचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ती चांगलीच संतापली आहे. या व्हिडिओत तिने हार्दिक पांड्याला पैशांची मदत मागितली असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, हार्दिक हा तिचा एक्स बॉयफ्रेन्ड असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, उर्वशीने एक पोस्ट शेअर करून या व्हिडिओचा चांगलाच समाचार घेतला आहे.
तिने या व्हिडिओत सांगितलेले वृत्त फेटाळले आहे. तसेच, अशाप्रकारच्या बातम्या न पसरवण्याचे आवाहनही केले आहे. 'मी प्रसारमाध्यमं आणि यूट्यूबवरील चॅनेल यांना विनंती करते, की अशा पद्धतीच्या स्टोरी अपलोड करू नका. माझेही कुटुंब आहे. मला त्यांनाही उत्तरं द्यावी लागतात', असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.