नवी दिल्ली : गेल्या महिन्यात कोरोनाची बाधा झालेली टीव्ही स्टार सारा खानची तब्येत सुधारली आहे पुन्हा तिने शूटिंगला सुरुवातही केली आहे. 10 सप्टेंबर रोजी साराने चाहत्यांना कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
"मला ताप येत होता. चव आणि गंध जाणवत नव्हता. त्यानंतर मी कोरोनाची चाचणी केली. यात मला बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. मला सुरुवातीला काळजी वाटत होते. नंतर मी धैर्याने हे स्वीकारले आणि स्वतःचे विलगीकरण केले'', असे सारा म्हणाली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
उपचाराबद्दल ती म्हणाली, बहुतेक प्रयत्न हा प्रतिकार शक्ती वाढवण्याचा आणि आरोग्याची स्थिती चांगली ठेवण्याचा होता. त्यानंतर जीवनसत्वे, स्टीम घेणे या गोष्टी सहाय्यभूत ठरतात. जे लोक या आजाराशी लढत आहेत, त्यांच्यासाठी साराने संदेशही दिला आहे.
"घाबरू नका आणि डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचना पाळणे आवश्यक आहे. निगेटिव्ह चाचणी येईपर्यंत सुरक्षित अंतर राखणे, नेहमी पास्क घालणे अत्यंत आवश्यक आहे." असेही ती म्हणाली.
संतोषी माँ सुनाये व्रत कथायँमध्ये देवी पालोमीची भूमिका साकारणारी सारा पुन्हा एकदा रिकव्हरीनंतर शोच्या सेटवर परतली आहे.