ETV Bharat / sitara

सलमान खान बिग बॉस १६ चा होस्ट असणार नाही? चर्चेला उधाण - बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने अभिनेता-मॉडेल प्रतीक सहजपालला मागे टाकत रिअॅलिटी शो "बिग बॉस" सीझन 15 ची विजेती बनली आहे. रिअॅलिटी शोचा होस्ट सलमान खान याने रविवारी मध्यरात्री तेजस्वी प्रकाशला 'बिग बॉस 15' चा विजेती असल्याचे घोषित केले. शो बंद करीत असताना पुढच्या सिझनमध्ये आपण असू किंवा नसू मात्र शो सुरू राहिल असे सलमानने सांगितले. त्यामुळे मनोरंजन जगतात सलमानच्या या वाक्याची चर्चा सुरू झाली आहे.

सलमान खान
सलमान खान
author img

By

Published : Jan 31, 2022, 12:20 PM IST

मुंबई - बिग बॉसच्या घरात गेली १६ आठवडे सुरू असलेला ड्रामा आणि त्याचे सस्पेन्स संपले असून १५ व्या सिझनची विजेती घोषित करण्यात आले आहे. रिअॅलिटी शोचा होस्ट सलमान खान याने रविवारी मध्यरात्री तेजस्वी प्रकाशला 'बिग बॉस 15' ची विजेती म्हणून घोषित केले. शो बंद करीत असताना पुढच्या सिझनमध्ये आपण असू किंवा नसू मात्र शो सुरू राहिल असे सलमानने सांगितले. त्यामुळे मनोरंजन जगतात सलमानच्या या वाक्याची चर्चा सुरू झाली आहे.

कलर्सवर प्रसारित होणार्‍या 'नागिन 6' या काल्पनिक मालिकेतील अभिनेत्री आणि अभियांत्रिकी पदवीधर-टीलीव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश बिग बॉस ट्रॉफी आणि 40 लाख रुपयांचा धनादेश घेऊन घरी जाणार आहे.

या स्पर्धेत तगडा मानला जात असलेला एमिटी लॉ स्कूलचा माजी विद्यार्थी आणि एक प्रेरक वक्ता प्रतिक सहजपालला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. माजी रोडीज 'गँग लीडर' आणि नंतर ज्याने 'गुमराह' हा क्राईम शो होस्ट केला तो करण कुंद्रा या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर राहिला. दुसरे स्थानही न मिळाल्याने करण खूप निराश झाला.

"माझ्यासोबत किंवा माझ्याशिवाय" पुढच्या सीझनची वाट पाहत असल्याचे सांगून सलमानने शो बंद केला. आपण 'बिग बॉस 16' मध्ये सलमानला पाहणार आहोत का? हा प्रश्न मनोरंजन उद्योगातील काही काळ गॉसिपचा विषय बनणार आहे.

हेही वाचा - Bigg Boss 15 Winner : 'बिग बॉस' विजेती तेजस्वी प्रकाशला मिळाली इतकी रक्कम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.