तुझ्यात जीव रंगला मालिकेतील चालतय की म्हणणारा राणा आणि अंजली हे कोल्हापूर प्रेस क्लबच्या रंगपंचमीत सहभागी सहभागी झाले होते. यावेळी प्रेस क्लब चे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, सर्व पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.
गेले तीन वर्षे कोल्हापुरात त्यांच्या या तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे शूटिंग सुरू आहे मात्र कधीच त्यांनी आशा प्रकारे रंगपंचमीचा आनंद इथे घेतला नाही पण आज मात्र शुटिंगचे सगळे शेड्युल बाजूला ठेऊन त्यांनी रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला... शिवाय सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या.