मुबंई - 1998 साली आलेल्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली होती. प्रशांत दामले आणि कविता लाड मेढेंकर यांच्या लग्न होईपर्यंतचा विषय या नाटकात मांडण्यात आला होता. आता लग्नानतंर दामपत्याच्या जीवनातील घडणाऱ्या रंजक गोष्टी 'तू म्हणशील तसं' या नाटकाद्वारे करण्यात येत आहे. येत्या 20 डिसेंबरपासून या नाटकाचा शुभारंभ होणार असून पहिला प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात रंगणार आहे.
हेही वाचा - पाहा, 'मेकअप' टीझर : पुन्हा एकदा 'याड' लावायला रिंकू राजगुरू सज्ज
'गौरी थिएटर्स' तर्फे या नाटकाची निर्मिती करणार असून 'पुणे थिएटर्स' या संस्थेची साथ त्यांना मिळाली आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री भक्ती देसाई याची जोडी या नाटकात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अजय कुलकर्णी आणि प्रिया यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. यापुर्वी नवरा-बायकोच्या नात्याची गोष्ट सांगणारी अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर येऊन गेली त्यातील काही विशेष गाजली.
नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेता प्रसाद ओकने आपल्या खांद्यावर घेतली आहे. एकमेकांचं काम आवडत असल्याने आणि एकमेकांबद्दल खात्री असल्यानेच आपण हे नाटक एकत्र करायचा निर्णय घेतलाचे प्रशांत दामले आणि प्रसाद ओक यांनी स्पष्ट केलं. हे मुळ नाटक संकर्षणने लिहिलं असलं असून तरीही त्यात ते बसवताना त्यात अनेक नवनवीन जागा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना नक्की आवडेल याची या टीमला खात्री आहे.
लग्नानंतरची काही वर्ष ही नवरा बायकोला एकमेकांना ओळखण्यात जातात. ऐकमेकांना समजून घेण्याचा हा काळ असतो. अशात एकमेकांना समजून घेतल्याने अनेक प्रश्न सुटतात. मात्र समजून न घेतल्याने समस्या सुटण्याऐवजी नात्यातील गुंता वाढत जातो किंवा काहीवेळा नातं सपण्यात त्याची परिणीती होऊ शकते. नात्याच्या या उतार चढाव आणि त्यातली गंमत जम्मत मांडण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात येणार आहे. सध्या मुंबईत नाटकाच्या जोरदार तालमी सुरू असून नवरा बायकोच्या दैंनदिन जीवनातील रंजक गोष्टी या नाटकातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं संकर्षण आणि भक्ती यांनी सांगितलं